‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर हा त्याच्या विनोदी अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो. प्रसाद हा उत्तम अभिनेता तर आहेच. पण तो उत्तम लेखक व दिग्दर्शकही आहे. आपल्या विनोदी स्किट्समुळे चर्चेत राहणार प्रसाद सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अभिनयासंबंधित नेहमीच तो काही ना काही शेअर करत असतो शिवाय तो त्याच्या कुटुंबाबरोबरच्याही पोस्ट शेअर करून चर्चेत असतो. अशातच प्रसादने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Prasad Khandekar On Wife)
नुकताच प्रसादच्या लग्नाचा वाढदिवस झाला. प्रसादने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला सरप्राईज दिलं असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रसादने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बाईक गिफ्ट दिली आहे. आणि हे गिफ्ट तिच्यासाठी सरप्राईज असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये प्रसाद त्याच्या बायकोच्या डोळ्यावर हात ठेवून तिला बाहेर घेऊन येतो. बाहेर आल्यानंतर समोर उभी असलेली बाईक ही तिची असल्याचं प्रसाद सांगताना दिसतो. ते पाहून त्याच्या पत्नीला खूप आनंद झालेला पाहायला मिळत आहे.
प्रसादने हा व्हिडीओ शेअर करत, “अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. पहिली एकांकिका ते पहिला सिनेमा या संपुर्ण प्रवासात तू बरोबर आहेस. तुझ्या संगतीशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं आणि शक्य होणार ही नाही. आज लग्नाचा दहावा वाढदिवस अजून खुप दशक पार करायची आहेत. बाकी माझी तब्येत, माझं शेड्युल या बाबतीतील तुझ्या तक्रारी लवकरच सोडवेन” असं लिहिलं आहे.
यापुढे त्याने, “तुला नेहमी मी सरप्राईज द्यावं असं वाटतं पण मला एवढं कोळून प्यायलीस की मी काय सरप्राईज देणार आहे, हे तू आधीच ओळखतेस त्यामुळे ते सरप्राईज राहतचं नाही. पण मला खात्री आहे आजचं हे स्पेशल सरप्राईज तू ओळखू शकली नसतीस. हा आंनद, हे प्रेम असंच वाढत राहू दे. शेवटी माझं आवडत गाणं तुझ्यासाठी, “आपकी मंज़िल हूँ मैं, मेरी मंज़िल आप हैं, क्यों मैं तूफाँ से डरूँ, मेरा साहिल आप हैं, कोई तूफानों से कह दे, मिल गया साहिल मुझे” असंही म्हटलं आहे. प्रसादच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा भरभरून वर्षाव केला आहे.