शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत ‘हे’ कलाकार

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 18, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bollywood intercast marriage

प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत 'हे' कलाकार

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी ही धर्माने हिंदू असून जहीर मुसलमान आहे. दोघांचे धर्म वेगळे आहेत तरीही लग्न करत आहेत यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सोनाक्षीच्या लग्नाला आई-वडिलांचा पाठिंबा असण्याबाबत अनेक अंदाजदेखील बांधले जात आहेत. मात्र प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असं म्हणतात हे खरं आहे. त्यामुळे सर्वांच्या बोलण्याकडे  दुर्लक्ष करुन सोनाक्षी व जहीर लग्न करणार आहेत. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये अजूनही काही जोड्या आहेत ज्यांनी धर्माची बंधनं झुगारून लग्न केले आहे. (bollywood intercast marriage )

मोहसीन खान हे पाकिस्तानी क्रिकेटर होते. तसेच त्यांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी अभिनेत्री रिना रॉय यांच्याबरोबर लग्न केले. त्यांचे नाते खूपच चर्चेत राहिले होते. दोघांनाही अनेक समस्यांचाही सामना करावा लागला. १९८३ साली ते लग्नबंधनात अडकले. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा – “तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि…”, अमेय वाघची बायकोसाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाला, “कचरा बाहेर काढून ठेवायचा विसरेन पण…”

त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं लग्नदेखील अधिक चर्चेत राहिले. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिलानेदेखील मोहसीन अख्तरबरोबर लग्नगाठ बांधली. ३ मार्च २०१६ रोजी ती मोहसीनबरोबर लग्नबंधनात अडकली. उर्मिला मराठी असून मोहसीन हा काश्मिरी मुसलमान आहे. तसेच उर्मिला ही मोहसीनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

आणखी वाचा – “तरीही संसार करेन मनापासून आणि…”, लीलाचा एजेसाठी हटके उखाणा, ऐकून कुटुंबियांनाही झाल भलताच आनंद

बॉलीवूड दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शिका व निर्माती फराह खानने देखील वेगळं धर्म असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केले. फराह शिरीष कुंदेरबरोबर लग्नबंधनात अडकली. ‘मै हू ना’ या चित्रपटाच्या  सेटवर शिरीष व फराहची भेट झाली. तेव्हा दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. शिरीष हा फराहपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. लग्नाआधी त्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

रितेश देशमुख व जेनीलिया डिसुजा ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांच्या  प्रेमात पडले. रितेश हा मराठी असून जेनीलिया ही मंगलोरीयन कॅथलिक आहे. २०१२ साली दोघंही लग्नबंधनात अडकले.

मलाइका अरोरा व अरबाज खान हीदेखील मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी होती. १९९३ साली त्यांनी एकत्र कॉफीची जाहिरात हेली होती. त्यावेळी दोघं एकमेकांच्या  प्रेमात पडले होते. दोघांनी लग्नदेखील केले. मात्र काही कारणांमुळे ते वेगळे झाले.   

Tags: bollywoodbollywood celebritesintercast marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

आई आयसीयुमध्ये असल्यामुळे अनिरुद्ध वेडापिसा, संजना मात्र प्रॉपर्टी नावावर करण्याच्या घाईत, सासूच्या निधनाची वाट पाहत आहे आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.