नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज यांसारख्या माध्यमातून अभिनेता अमेय वाघने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील भूमिकेने घराघरातील तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. या मालिकेनंतर अमेयचे आयुष्य बदलले. त्याने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप उमटवली. उत्तम अभिनेता तसेच उत्तम विनोदबुद्धी असलेला हा अभिनेता प्रेक्षकांचाही लाडका आहे. आजवर अमेयने सिनेसृष्टीत स्वतःच नाव स्वतः कमावलं आहे. (Amey Wagh Cooking Video)
अमेय सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच तो त्याच्या नवनवीन प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असतो. मराठी सिनेसृष्टीसह अमेयने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अमेयने ‘मुरांबा’, ‘झोंबिवली’, ‘कारखानीसाची वारी’, ‘गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच त्याने काही हिंदी वेबसीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याच्या ‘जग्गू व ज्युलिएट’ चित्रपटाचीही विशेष चर्चा रंगली होती.
सोशल मीडियावरही अमेय बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच काही खास अपडेट तो सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअरही करतो. अशातच अमेयने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेय सध्या त्याच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधुन वेळात वेळ काढत कुटुंबासह वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी त्याने खास जेवणाचा बेत केलेला पाहायला मिळत आहे. अमेयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो अक्खा मसूरची भाजी बनवताना दिसत आहे.
वेळात वेळ काढून अमेयने खास जेवणाचा बेत केलेला दिसत आहे. अमेयच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेयच्या या व्हिडीओवर सुव्रत जोशीने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. “असुर प्रमाणे मसूरला यश मिळो, त्याचेही भरपूर सिझन येवोत”, असं सुव्रतने म्हटलं आहे. अमेयची असुर ही वेब सीरिज विशेष गाजली होती. आता सगळेचजण त्याच्या या वेब सीरिजच्या आगामी भागांकडे लक्ष लावून बसले आहेत.