सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मॅक्सी घालून हातात बाळ अन् आता…; ऐश्वर्या नारकरांनी स्वतःलाच म्हटलं संतूर मम्मा, रुपही बदललं, नेटकरीही म्हणाल्या, “संतूर आजीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 8, 2024 | 3:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Fitness

Video : मॅक्सी घालून हातात बाळ अन् आता…; ऐश्वर्या नारकरांनी स्वतःलाच म्हटलं संतूर मम्मा, रुपही बदललं, नेटकरीही म्हणाल्या, "संतूर आजीही…"

कलाकार आणि त्यांच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक होतं. कलाकारांच्या फिटनेसचे लाखो चाहते दिवाने असतात. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या योगा वा जिमचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअरही करतात. फिटनेसच्या बाबतीत एका मराठमोळ्या अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या यांचा फिटनेस तरुणाईलाही लाजवेल असा आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसचे धडे त्या वेळोवेळी शेअर करताना दिसतात. ऐश्वर्या यांचा सोशल मिडियावरही बराच वावर असलेला पाहायला मिळत आहे. (Aishwarya Narkar Fitness)

सोशल मीडियावरही ऐश्वर्या नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचे ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करतात. अनेकदा दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ शेअर करतात. यावरुन बरेचदा दोघेही ट्रोलही झाले आहेत. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ते नेहमीच व्हिडीओ शेअर करतात. अशातच ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – “लग्नानंतर महिलांवर अत्याचार…”, आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मोठं विधान, किरण राव म्हणाली, “आमिर आणि मी…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन फिटनेसबाबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यांत ऐश्वर्या यांनी “संतूरवाली आई बनण्याचा विचार केला होता, आणि बोललेलं करूनही दाखवलं”, असं कॅप्शन देत त्यांचा जुना फोटो ते आता फिट असतानाचा फोटो शेअर करत फरक दाखवला आहे. ऐश्वर्या नारकर नेहमीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन योगा करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करतात. शिवाय डाएटच्या बाबतीतही त्या विशेष काळजी घेताना दिसतात.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला कुटुंबियांनी मिळून दिलं मोठं सरप्राइज, हॉटेलमध्ये आला अन्…; अभिनेताही भारावला

ऐश्वर्या यांच्या संतूरवाली आई या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्या खरंच संतूर आई असल्याचं म्हटलं. तर काहींनी काही वर्षांनी संतूर आजी व्हाल असंही म्हटलं आहे. ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्या रुपाली म्हात्रे ही भूमिका साकारताना दिसत आहेत.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar Fitnessentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Prasad Jawade shared a special video to congratulate wife Amruta Deshmukh for winning the best actress award at Zee Natya Gaurav

"तू माझ्या डोळ्यात अश्रू आणलेस कारण...", बायकोची मेहनत पाहून गहिरवरला प्रसाद जवादे, म्हणाला, "घर शोधण्यापासून ते सोडतानाचा क्षण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.