सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन, वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 28, 2025 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mirza Rafi Ahmed Baig Passes Away

'मिर्झा एक्सप्रेस' फेम मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन, वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरावती येथे त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी सहा हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर २० काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी आणि दोन्ही मुली नव्हत्या; सनी व बॉबी देओल झाले भावुक

डॉ. मिर्झा यांचा जन्म 17 सप्टेंबर 1957 रोजी झाला. शेती, माती, ग्रामीण भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती, सामाजिक समस्यांवरील विनोदी शैलीतील लेखन त्यांच्या लोकप्रियतेचे केंद्रबिंदू ठरले. मराठी, वन्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते.

Tags: death newsmirza rafiMirza Rafi Ahmed Baig Passes Away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
kiara advani announces baby girl name

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.