‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग हादरला आहे. गेली सव्वाचार वर्षे ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या चढाव-उतारांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. असं असलं तरी या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूप मोठा आहे. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेमही करताना दिसतात. दरम्यान मालिकेतल्या कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. अशातच मालिकेतील एका लोकप्रिय पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने सध्या प्रेक्षक नाराज आहेत. (abhijeet kelkar on aai kuthe kay karte)
मालिकेत आता आशुतोष केळकर म्हणजेच ओंकार गोवर्धनचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आशुतोषचा अपघातात मृत्यू झाला असून त्यामुळे अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढवलं आहे. अरुंधती आशुतोषच्या जाण्यातून सावरलेली नाही. तर एकीकडे आशुतोषची आई सुलेखा ताईदेखील लेकाच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. मालिकेतील हा सीन पाहून सगळेच प्रेक्षक आशुतोषला मिस करत आहेत. इतकंच नव्हेतर कलाकार मंडळींनाही आशुतोषच्या जाण्याने दुःख झालं आहे.
आशुतोषच्या जाण्याने केवळ मालिकेतील कलाकारांनाच नाहीतर मालिकेशिवाय इतरही कलाकारांना दुःख झालं आहे. आशुतोषच्या मालिकेतील एक्झिटनंतर मिलिंद गवळी, मधुराणी प्रभुलकर यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धनच्या स्वभावाचं कौतुक करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलं. आशुतोषची पत्नी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने देखील ओंकारला मिस करत असल्याची खास पोस्ट शेअर केली.
अरुंधतीच्या या पोस्टवर अभिजीत केळकरनेही कमेंट करत म्हटलं की, “मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाही किंवा स्वीकार करता येणार नाही. त्याही पलीकडे जाऊन, यापुढे तुला त्याच्याशिवाय तसं पाहणं जमणार नाही. हे तुमच्यावरचं प्रेम म्हणा वा सवय किंवा आणखीन काही”. तर खुशबू तावडेनेही हार्ट ईमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या.