सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 28, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir Kapoor and Alia Bhatt New Home

आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते त्यांची लेक राहा कपूरमुळे चर्चेत आले आहेत. राहा झाल्यांनतर त्यांनी वर्षभर तरी तिचा चेहरा मीडियासमोर आणला नव्हता. मात्र तिला एक वर्ष होताच त्यांनी राहाची झलक दाखवली. तेव्हापासून राहा चर्चेत आली आहे. यानंतर आता कपूर कुटुंबाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रणबीर व आलिया त्यांच्या ड्रीम हाउसमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Ranbir Kapoor and Alia Bhatt New Home)

आलिया-रणबीर आणि राहा लवकरच मुंबईतील वांद्रे येथील कृष्णा राज बंगल्यात राहणार आहेत. या बंगल्याबाहेर रणबीर कपूर व आलिया अनेकदा स्पॉट झाले आहेत. बांधकामाची तपासणी करण्यासाठी हे जोडपे बरेचदा घरात गेले आहेत. गेल्या एक वर्षापासून या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बंगल्याला राहा हिचे नाव देण्यात येणार आहे. सदर बंगला पूर्वी दिवंगत अभिनेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज यांच्या नावावर होता. कपूर कुटुंबाचा एकुलता एक नातू असल्याने ही मालमत्ता रणबीरच्या नावावर झाली. अशातच नुकताच रणबीर घरातील काम कसे सुरु आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर स्पॉट झालेला दिसला. यावेळी त्याच्याबरोबर आलिया व त्याची आई नीतू कपूरही उपस्थित होत्या.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आशुतोषचा मृत्यू मराठी कलाकारांनाही बघवेना, सुप्रसिद्ध अभिनेता कमेंट करत म्हणाला, “अरुंधतीला त्याच्याशिवाय पाहणं…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘बॉलीवूड लाइफ’ने सूत्रांच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “आलिया व रणबीर दोघेही या घरात त्यांच्या कष्टाचे पैसे गुंतवत आहेत. जेणेकरून ते त्यांच्या स्वप्नातील घर त्यांच्या इच्छेनुसार बनवू शकतील. घराची एकूण किंमत २५० कोटी रुपये असेल. शाहरुख खानच्या ‘मन्नत’ आणि अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’ प्रमाणे आता हे मुंबईतील सर्वात महागड्या घरांपैकी एक असेल”.

आणखी वाचा – “बहिणीची काळजी घे”, तितीक्षा तावडेच्या भावाने सिद्धार्थ बोडकेचा पिळला कान, अभिनेता उत्तर देत म्हणाला, “ओके ओके मी…”

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या मुलीवर अपार प्रेम करणारा रणबीर त्यांच्या बंगल्याचं नाव राहा ठेवू शकतो. चाहत्यांच्या सिद्धांतानुसार राहा बॉलिवूडची सर्वात मोठी स्टार किड बनेल. या आलिशान बंगल्याशिवाय रणबीर व आलिया यांच्याकडे वांद्रे येथे आणखी ४ फ्लॅट आहेत. ज्यांची एकूण किंमत 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Tags: entertainmentraha kapoorranbir kapoor and alia bhatt daughterRanbir Kapoor and Alia Bhatt New Home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
Nawazuddin Siddiqui and Aaliya Siddiqui

नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीचे डोळे उघडले, कुटुंबाबरोबरचा एकत्र फोटोही शेअर केला, म्हणाली, "तिसऱ्या व्यक्तीमुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.