‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं हे पाचवं पर्व विशेष गाजताना दिसतंय. विविध क्षेत्रातील आलेली ही कलाकार मंडळी त्यांच्या परीने हा खेळ खेळताना दिसत आहेत. बरेचदा स्पर्धकांचे वाद, प्रेम, मैत्री, जिव्हाळा हे सारं काही एकाच घरात एका छताखाली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात यंदाच्या पर्वात स्पर्धक मंडळींनी तुफान राडे केलेले पाहायला मिळाले. मात्र भाऊच्या धक्क्यावर त्यांची तितकीशी शाळा घेतली गेली नाही म्हणून अनेकांनी या शोला टोलही केलं. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना त्याच वेळी शिक्षा सुनवायला हवी होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. याउलट त्यांनी त्यांच्यावरील प्रेमापोटी हे सगळं काही झाकून ठेवलं, असं म्हणत आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Abhijeet Kelkar On Bigg Boss Marathi)
हा मराठमोळा अभिनेता म्हणजेच अभिजीत केळकर. अभिजीतने आजवर अनेक मराठी मालिकांमधून चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र अभिजीतला ‘बिग बॉस मराठी’ मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस मराठी’मध्ये अभिजीत केळकर हा दिसला. सोशल मीडियावर अभिजीत बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा तो त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ट्रोलही होताना दिसतो. अशातच काही दिवसांपासून सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वावर अभिजीत भाष्य करताना दिसतोय. त्याला न पटलेल्या मुद्द्यांवर तो स्पष्टपणे पोस्टही शेअर करत आहे. अशातच आता अभिजीतने शेअर केलेली आणखी एक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीने कॅप्टनचं न ऐकण्याचा निर्णय घेतला. आणि घरात मनमानी कारभार पाहायला मिळाला. घरात एकही काम करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. जान्हवीनेही आम्ही केलेलं जेवण जेवायचं नाही म्हणत निक्कीला टक्कर दिली. पण, शेवटी ‘बिग बॉस’ जान्हवीला निक्कीला चहा बनवून देण्यास सांगतात. निक्कीची वागणूक पाहूनही तिला अद्याप शिक्षा देण्यात आलेली नाही. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर अभिनेता अभिजीत केळकरनेही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
अभिजीतने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत, “Bigg Boss पडलंय प्रेमात आणि प्रेम असतं XXX… त्यामुळे आता’ कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही. घरातलं समान उचलून आपटलं, लाथ मारु0न पाडलं. शारीरिक हिंसा झाली तरी आता त्याला कोणीच Unfair वाटत नाही. तो आता स्वत:चाच इतिहास विसरलाय. आता त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा”, असं म्हणत टोमणा ‘बिग बॉस’लाच टोमणा मारला आहे.