बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२३व्या वर्षातच एक्स गर्लफ्रेंडचं निधन, दारुचं व्यसन अन्…; आस्ताद काळेचा वाईट काळ, म्हणाला, “इंडस्ट्रीतून हकलवून देतील असं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2024 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aastad Kale emotional

२३व्या वर्षातच एक्स गर्लफ्रेंडचं निधन, दारुचं व्यसन अन्…; आस्ताद काळेचा वाईट काळ,

Aastad Kale : मराठी मालिका, नाटक, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेता आस्ताद काळेने चाहत्यांमध्ये छाप पाडली. दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायमच आस्ताद प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. इतकंच नाही तर आस्ताद त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. आस्ताद बरेचदा त्याच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळाबाबत बोलताना दिसतो. आस्ताद ज्या अभिनेत्रीसह रिलेशनमध्ये होता तिच्या निधनानंतर तो बराच खचला होता. आस्तादच्या तोंडून बरेचदा त्याच्या या नात्याबद्दल ऐकलं आहे. अभिनेत्री प्राची मते हिच्याबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र बोनमॅरो कॅन्सर या आजाराने प्राचीची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीत स्थिरावणाऱ्या प्राचीचा आजार अंतिम टप्प्यात असल्याचे निदान झाले, आणि उपचारांती तिचं निधन झालं.

आस्तादने ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्युब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो प्राचीच्या आठवणींबद्दल बोलताना दिसला. यावेळी बोलताना तो भावुकही झाला. आस्ताद म्हणाला, “प्राची. महाराष्ट्र कल्चरलच्या ग्रिप्सच्या ग्रुपमध्ये काम करायची. तिच्याबद्दल मी बाबाकडून वर्णन ऐकलं होतं. बाबाने बसवलेलं एक नाटक मी बघायला गेलो तेव्हा मी प्राचीला भेटलो. मी तिच्याकडे जाऊन जेवायला कधी जाऊया असं सरळ विचारलं, आणि त्यानुसार आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जेवायला गेलो. त्यानंतर बोलणं, भेटणं सुरु होतं. प्राचीला ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका मिळाली त्याआधी ती मुंबईला शिफ्ट होण्याबद्दल बोलली. तेव्हा मीच तिला म्हणालो की, आपण एकत्र राहिलो तर चालेल का?, यावर तिचाही होकार आला. त्यानंतर जवळपास साडेतीन चार वर्ष आम्ही एकत्र होतो”.

आणखी वाचा – Video : “म्हाताऱ्यांना जगण्याची उमेद दिलीस”, सिंबाला भेटायला चिमकुल्यांपासून ते वयोवृद्धांची गर्दी, साईराजची तुफान क्रेझ

View this post on Instagram

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale)

पुढे तो म्हणाला, “तिला जो आजार झाला होता तो दहा लाखांत एक किंवा दोन लोकांना होतो. आणि तो आजार मुळातच तिसऱ्या स्टेजला कळतो. त्यामुळे कळेकळेपर्यंत हातची वेळ निघून गेली होती. २४ की २५ डिसेंबरला तिला ऍडमिट केलं आणि १९ फेब्रुवारीला ती गेली. मी देव मानत नाही पण एक शक्ती आहे जी हे सर्व चालवते असं माझं मत आहे. १९ फेब्रुवारीला माझा लग्नाची बेडी या नाटकाचा मुंबईत प्रयोग होता. मी १८ तारीखला तिला भेटून निघालो तेव्हा तिची अवस्था प्रचंड वाईट होती. प्रयोग संपवून आम्ही पुण्याला जायला निघालो. जाताना मध्ये खाऊन येतो असं म्हटलं आणि मी घरी फोन केला. पोहोचल्यावर तिथे सगळे ओळखीचे लोक तिथे जमले होते. गाडीतून खाली उतरताच पटकन चल, बराच वेळ झाला आहे आता ठेवणार नाही असं कानावर आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि मी बाबाला थांबवून विचारलं बाबा गेली का?, तेव्हा तो हो असं म्हणाला. हे तिचं आजारपण डिसेंबरपासून सुरु झालं. अस्थी विसर्जनासाठी मी जेव्हा जात होतो, माझा एक मित्र गाडी चालवत होता आणि प्राचीचा फोन माझ्याकडे होता. तेव्हा तिच्या फोनवर एक फोन आला की, तुमचं कास्टिंग झालं आहे. पण तेव्हा मी हे आता शक्य नाही, अशी परिस्थिती आहे असं सांगितलं. वय वर्ष २३. २३ हे अशा पद्धतीने जायचं वय नाही. त्यावेळी माझी मम्मा खूप आवेगाने म्हणाली होती, दारू, सिगारेट, रात्रीची जागरण करतात त्यांना काही होतं नाही आणि हिच्या वाटेला हे आलं.

आणखी वाचा – लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला प्रसाद जवादेने बायकोला दिलं सरप्राइज, थेट पांचगणीला घेऊन गेला अन्…; व्हिडीओ व्हायरल

आस्तादच्या आयुष्यातून आणि हे जग सोडून प्राची गेल्यानंतर त्याची अवस्था कशी होती याबाबत बोलताना तो म्हणाला, “प्राची गेल्यानंतर मी अल्कोहोलिक झालो. जवळजवळ दीड वर्ष मी कामाच्या बाबतीत इतका बेशिस्त वागलो की इंडस्ट्रीतून माझी हाकलून द्यायची लायकी झाली होती. ज्या घरात मी आणि प्राची राहत होतो, त्याच घरात मी ती गेल्यानंतरही राहत होतो. दिवस कामात निघून जायचा पण कुलूप उघडून आत गेलो की, घर आणि प्रत्येक वस्तू मला खायला उठायची. प्राचीच्या बाबतीत आपण या वेळेला कसे चुकीचे वागलो. हे पुढचे दोन-तीन महिने मला आठवू लागलं. त्या काळात मी खूप बेशिस्त वागलो. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका मी करत होतो, त्या युनिट मधील प्रत्येकाने मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं. या गोष्टीला जवळपास १२ वर्ष झाली आहेत. त्या चुकांचे पडसाद आज आम्हा कोणाच्याही नात्यात उमटत नाहीत”.

Tags: aastad kaleAastad Kale and prachi matemarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Rishab Shetty Movie

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, ऐतिहासिक चित्रपटाची मोठी घोषणा, पोस्टर समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.