चंद्रमुखी, हिरकणी या दमदार चित्रपटानंतर अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओक एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. वडापाव या चित्रपटाच्या नावानेच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.लंडनमध्ये या चित्रपटाचं शूट सुरु आहे. ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. (manjiri oak cooking)
या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे रसिक वेंगुर्लेकर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.रसिकाला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकाविश्वातून रसिकाने आजवर साऱ्यांचं मनोरंजन केलं आहे.रसिकाला खरी लोकप्रियता मिळाली ती महारष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून. आता वडापाव या चित्रपटाच्या माध्यमातून रसिका मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
वडापावच्या सेटवर रंगली कलाकारांची पोहे पार्टी (manjiri oak cooking)
लंडनमध्ये चित्रपटाचं शूट सुरु आहे. शूटदरम्यान कलाकारांची पडद्यामागची धमाल पाहायला मिळते.असाच एक शूट दरम्यानचा व्हिडिओ रसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे त्यात मंजिरी ओक सर्वांसाठी पोहे बनवत आहेत. मंजिरीने परदेशात स्वतःच्या हाताने बनवलेल्या या पोह्यांचा आनंद घेताना सर्व कलाकार पाहायला मिळाले.(manjiri oak cooking)
दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.” ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा. अशी काही तरी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा : प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ या गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरीचा लंडन येथे मुहूर्त संपन्न