सध्या मल्याळम मनोरंजन क्षेत्राबाबत मोठ्या घडामोडी समोर येताना दिसत आहेत. या क्षेत्रातून अनेक धक्कादायक खुलासेदेखील होताना दिसतात. यामध्ये अभिनेत्री मिनू मुनिरचा समावेश झाला आहे. मिनूने केलेली सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये दावा केला की मुकेश, मनियानपिला राजू, ईदावेला बाबू व जयसूर्या यांनी २०१३ साली एका सेटवर शारीरिक व मौखिक स्वरूपात गैरव्यवहार केला होता. या घटनेमुळे निर्मितीसंस्थेचेदेखील नाव समोर आले होते. याबाबतची खळबळजनक पोस्ट समोर आली आहे. (minu munnir statement)
मिनूने फेसबुकवर मोठी पोस्ट शेयर केली आहे. तिने लिहिले की, “मी मल्याळम चित्रपटसृष्टीतील मुकेश, मनियानपिला राजू, इदावेला बाबू, जयसूर्या, वकील चंद्रशेखरन्, प्रोडक्शन कंट्रोलर नोबल यांनी माझ्याबरोबर शारीरिक त्रास व मौखिक अपशब्द वापरले होते. याबद्दलचा मी आता रिपोर्ट लिहित आहे”.
ती म्हणाली की, “२०१३ साली एका प्रोजेक्टवर काम करताना या व्यक्तीनी मला शारीरिक व मौखिक अपशब्द वापरुन त्रास दिला. मी सगळी मदत करुन काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं विचित्र वागणं सुरुच राहिलं. मला नंतर ते सगळं सहन झालं नाही. त्यामुळे मला मल्याळम चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मला नाईलाजाने चेन्नईला स्थायिक व्हावे लागले”.
त्यांनी पुढे लिहिले की, “मी एका वर्तमानपत्राच्या लेखामध्ये या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवला होता, मी आता मला जो त्रास झाला त्यासाठी न्याय मागत आहे. मी खूप सहन केले. त्यांनी जे चुकीचे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई व्हावी मी मागणी करते”. त्याचप्रमाणे मिनू यांनी माध्यमांशी बोलताना मुकेशबरोबरचा भयानक प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितले की, “जेव्हा मी AMMA (असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट)च्या सदस्यत्त्वाची मागणी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की सदस्यत्त्व हवे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील”.
दरम्यान मिनू यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सगळ्याच ठिकाणी याबद्दल आवाज उठवले जात आहेत. यासाथी केरळ सरकारने आता ७ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे.