सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : ‘हम दोनों दो प्रेमी’ म्हणत निक्कीबरोबर जुळले अभिजीतचे सूर, एकत्र बघून इतर सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, नक्की गेम काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2024 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 nikki arbaaz love

'बिग बॉस'च्या घरात निक्की-अभिजीतची जोडी बंद करणार का सगळ्यांची बोलती?, प्रोमो समोर

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता उलटे फासे पडताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील प्रेम संपलेलं असून वाद-विवाद, भांडण, हाणामारी होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात दोन टीम पडलेल्या दिसत आहेत. टीम ए मध्ये अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दरम्यान टीम ए मधून निक्कीने एक्झिट घेतली असल्याचं पाहायला मिळालं. भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर तिच्या टीममधील स्पर्धकांची पोलखोल केली. त्यामुळे निक्कीला खूप मोठा धक्का बसला.

दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये इतर स्पर्धक निक्कीबाबत चर्चाही करताना दिसले. भाऊच्या धक्क्यावेळी रितेशने अभिजीत व निक्की आणि अरबाज व आर्या या दोघांना एकत्र राहायचा टास्क दिला. सुरुवातीपासून निक्कीने अभिजीतबरोबर केलेली मैत्री अरबाजला खटकलेली दिसली. यावरुन त्यांच्यात अनेकदा वादही झाले. हे वाद काही काळापुरते राहिले. मात्र निक्कीसमोर अरबाजचा खरा चेहरा येताच निक्कीने अरबाजबरोबरचे आणि टीम ए मधील सर्व स्पर्धकांबरोबरचे संबंध कायमचे तोडून टाकले.

आणखी वाचा – ‘अप्पी आमची…’मधील अर्जुनच्या लेकीचं बारसं, कार्यक्रमासाठी साधंच पण युनिक पद्धतीने सजवलं घर, परंपरा जपत केलं अन्नप्राशन

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अशातच ‘बिग बॉस’ यांनी दिलेल्या नव्या टास्कचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज व निक्की एकत्र बसून बोलत असतात तेव्हा ‘बिग बॉस’ आवाज देत म्हणतात, अभिजीत तुम्ही जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थीवर कोणतं गाणं तुम्हाला सुचतंय?”, यावर अभिजीत म्हणतो, “हम दोनो दो…”. यावर सर्वत्र हशा पिकतो. तेव्हा अंकिता वालावलकर म्हणते, “आज आम्हाला कळलं जोड्या ‘बिग बॉस’च्या घरात बांधलेल्या असतात”. यानंतर अभिजीत व निक्की पुढे येत, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहेना” हे गाणं गाताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने गर्लफ्रेंड असल्याची दिली कबुली, प्रश्न विचारताच नात्याच केला स्वीकार, निक्कीने तोंड वाकडं केलं अन्…

अभिजीत व निक्कीला एकत्र वेळ घालवताना, गाताना पाहून टीम ए मधील स्पर्धकांचा चेहरा उतरला. मात्र इकडे टिमबरोबर नसल्याने निक्कीच्या चेहऱ्यावर कोणतंच टेन्शन दिसलं नाही. आता अभिजीत व निक्कीमधील मैत्री कितपत फुलणार?, अरबाज, आर्या मिळून या दोघांना हरवणार का? हे सार टास्क दरम्यान पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki tamboli and abhijeet sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
minu munnir statement

शारिरीक सुखाची मागणी, घाणेरड्या शब्दांत बोलले अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे इंडस्ट्रीतील काही व्यक्तींवर मोठे आरोप, नक्की काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.