बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमन गील व सारा तेंडूलकरच्या नात्यावर शिक्कामोर्तब, सारा अली खानने खरं काय ते सांगितलं, म्हणाली, “संपूर्ण जग…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 7, 2023 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sara Ali Khan on shubman gill

शुभमन गील व सारा तेंडूलकरच्या नात्यावर शिक्कामोर्तब, सारा अली खानने खरं काय ते सांगितलं, म्हणाली, “संपूर्ण जग…”

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण सीजन ८’ सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक कलाकारांविषयी जाणून घेण्यास चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. या कार्यक्रमाच्या गेल्या भागात बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रणवीर सिंह व दीपिका पदुकोण येऊन गेले. त्यावेळी दीपिकाने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. या शोच्या आगामी भागात अभिनेत्री सारा अली खान व अभिनेत्री अनन्या पांडे हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सारा खान तिच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसत आहे. (Sara Ali Khan on shubman gill)

करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘कॉफी विथ करण ८’ चा आगामी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमध्ये सारा व अनन्या एकत्र दिसणार आहेत. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करणने दोघींनाही त्यांच्या लव्ह लाइफविषयी प्रश्न विचारल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये करण साराला विचारतो की, “तुझ्या व शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप साऱ्या अफवा पसरत आहेत”. यावर उत्तर देताना सारा अली खानला हसू येते आणि यावर ती म्हणते की, “तुम्ही चुकीच्या साराला प्रश्न विचारत आहात. संपूर्ण जग हे चुकीच्या साराच्या मागे लागले आहे”.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – कमल हसन यांनी वाढदिवशी केली नव्या चित्रपटाची घोषणा, पोस्टर समोर, तब्बल ३६ वर्षानंतर मणिरत्नम यांच्याबरोबर काम करणार

सारा अली खानने केलेल्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत. साराच्या वक्तव्यामुळे शुभमन व सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाला का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. शुभमन हा अनेकदा सारा तेंडुलकरबरोबर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसला होता. त्याचबरोबर सारादेखील अनेकदा शुभमनला मॅचदरम्यान पाठिंबा देताना दिसली.

आणखी वाचा – ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या पाठिंब्यावर रश्मिका मंदानाची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांमुळे…”

दरम्यान सारा तेंडुलकर व शुभमन यांनी त्यांच्या नात्यावर अद्याप भाष्य केलेलं नाही. पण सारा अली खानच्या वक्तव्यानंतर शुभमन सारा अली खानला नाही तर सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. आता या चर्चांनंतर तरी शुभमन व सारा तेंडुलकर त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्य करणार का? हे पाहावं लागेल.

Tags: ananya pandeyentertainmententertainment newskaran johar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Jui Gadkari Social Work

फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन प्रेक्षकांनी केली आर्थिक मदत, ‘त्या’ व्हिडीओनंतर जुई गडकरीचं होतंय कौतुक, आश्रमात गेली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.