मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धमाल-मस्ती, डान्स अन्…; गोव्याच्या किनाऱ्यावर पूजा सावंतची Bride To Be पार्टी, प्रार्थना बेहरेची नवऱ्यासह हजेरी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant Bride Too Be Celebration

धमाल-मस्ती, डान्स अन्...; गोव्याच्या किनाऱ्यावर पूजा सावंतची Bride To Be पार्टी, प्रार्थना बेहरेची नवऱ्यासह हजेरी

ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच पूजा विवाहबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत पूजाने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे फोटो शेअर केले. रिंग फ्लॉन्ट करत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे अनेक फोटोस शेअर देखील केले होते. आता साऱ्यांच्या नजारा पूजाच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत. (Pooja Sawant Bride Too Be Celebration)

सध्या पूजा सावंत गोवा ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहे. पूजा तिच्या कलाविश्वातील मित्र मैत्रिणींसह गोवा ट्रिप एन्जॉय करत आहे. प्रार्थना बेहेरे व भूषण प्रधान यांच्यासह ती फिरायला गेली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावरील अनेक फोटोस, व्हिडीओस त्यांनी शेअर केले आहेत. गोव्यात मज्जा मस्ती करताना पूजा, भूषण, प्रार्थना यांच्यासह पूजाची भावंडं तसेच प्रार्थना बेहेरेचा नवराही दिसला. त्यांच्या गोव्यात एन्जॉय करतानाचा एक व्हिडीओ पूजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या लग्नात ‘लफडी’ शब्द झाला ट्रेंड, मृण्मयीला नेटकऱ्याने त्याचबाबत विचारला प्रश्न, उत्तर देत म्हणाली, “तो सारखं बोलतो की…”

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या मित्र मैत्रिनींनी बॅचलर पार्टी केलेली पाहायला मिळत आहे. ‘ब्राईड टू बी’ पार्टीचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कलाकारांनी केक कापून पूजाच्या ब्राईड टू बी पार्टीचे सेलिब्रेशन केले. त्यांनी यावेळी डान्सही केलेला पाहायला मिळाला. एकूणच भूषण, प्रार्थना यांनी पूजाच्या ब्राईड टू बी पार्टीचे धमाल सेलिब्रेशन करण्यासाठी गोवा ट्रिपचं आयोजन केलं होतं.

आणखी वाचा – “मायग्रेनचा त्रास होत होता आणि…”, ‘आई कुठे…’मधील अरुंधतीने सांगितला सेटवरील ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “डोकं ठणठणत असतानाही…”

पूजाने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना तिने त्यांच्या भेटीचा खुलासा केला. पूजा म्हणाली, “आम्ही अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटलो. पण त्यांनतर आम्ही खूप छान मित्र झालो. मला त्याचं स्थळ आलं होतं. त्यानंतर फोनवर आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही एकमेकांचे खूप छान मित्र झालो. फोनवर आम्ही खूप बोललो, खूप वेळ घेतला. एकमेकांबद्दल गोष्टी जाणून घेतल्या. हळू-हळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे अरेंज मॅरेज नसून अरेंज कम लव्ह आहे असं म्हणता येईल” असं ती म्हणाली.

Tags: bhushan pradhanmarathi actormarathi actresspooja sawantPooja Sawant Bride Too Be Celebrationpooja sawant goa tripprarthana behere
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
chala hawa yeu dya fame marathi actor kushal badrike shared special post in 2023 years memories

"मी गुंतवणूक केलेल्या..." २०२३ च्या आठवणीत कुशल बद्रिकेची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला "मित्रांनी सांगितलं नवीन वर्षात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.