शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू रॉकस्टार आहेस आणि…”, मंडीमधून कंगना रणौत विजयी झाल्यानंतर अनुपम खेर यांनी केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, “खूप मेहनत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2024 | 5:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anupam Kher Congratulations Post For Kangana Ranaut

"तू रॉकस्टार आहेस आणि...", मंडीमधून कंगना रणौत विजयी झाल्यानंतर अनुपम खेर यांनी केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, "खूप मेहनत..."

देशभरात गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर आज मतदान प्रकियेचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरु असून सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागून राहिल्या आहेत. अशातच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील लोकसभेच्या या निवडणुकीत बाजू मारलेली पाहायला मिळत आहे. कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आणि निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सध्या सर्वच स्तरातून अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. सर्वप्रथम अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाचे अभिनंदन केले आहे. ( Anupam Kher Congratulations Post For Kangana Ranaut)

बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणजेच कंगना रणौत आता राजकारणाच्या क्षेत्रात उतरली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तिने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीत अभिनेत्री आघाडीवर असून तिने विजेतेपद पटकावले आहे. अभिनेत्रीचे चाहते आणि जवळच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचाही समावेश आहे. अनुपम खेर यांनी कंगना रणौतचे अभिनंदन केले आहे. त्याने अभिनेत्रीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – पहिल्या नवऱ्याने सोडलं, नंतर सहकलाकाराबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थाटला संसार, इस्लाम धर्मही स्वीकारला अन्…; आता कसं जगते आयुष्य?

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कंगनाची निवडणूक प्रचारादरम्यानची छायाचित्रे जोडण्यात आली असून पार्श्वभूमीत जुगनी हे गाणे वाजत आहे. याचबरोबर त्यांनी कंगनाचे कौतुक करत कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की,”माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझ अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस”.

आणखी वाचा – सून, आई, बायको म्हणून चांगलं राहण्याचा ऐश्वर्या रायचा प्रयत्न, मात्र नणंदबाईशी अभिनेत्रीचं वाकडं, श्वेता बच्चन म्हणालेली, “ती खूप…”

अनुपम खेर यांनी कंगनासाठी पोस्ट लिहीत पुढे असेही म्हटलं की, “तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करुन कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकतं. जय हो”. अनुपम यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी व समर्थकांनी कमेंट करत कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: anupam kherAnupam Kher Congratulations Post For Kangana Ranautentertainmentkangana ranautkangana ranaut won
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Sania Mirza Love Life

शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाला पुन्हा करायचं आहे लग्न, नव्याने थाटणार संसार?, म्हणाली, "मला आधी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.