अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून आजवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत महेश मांजरेकर यांचा चांगलाच दबदबा आहे. महेश मांजरेकर यांच्या नावाचा सिनेविश्वात चांगलाच डंका असताना त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलांनीही सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. सई मांजरेकर, सत्या मांजरेकर या दोन्ही मुलांनी सिनेसृष्टीत कामास सुरुवात केली आहे.
तर महेश मांजरेकर यांची मानसकन्या म्हणून गौरी इंगवले हिला ओळखलं जात. गौरीने ही सिनेविश्वात आपल्या नृत्य आणि अभिनयाच्या आवडीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. पांघरून या चित्रपटातील गौरीची भूमिका वाखाणण्याजोगी होती. गौरीने अभिनय आणि नृत्याच्या जोरावर सिनेविश्वात नाव कमावलं आहे,(Mahesh Manjrekar Daughter story)
बालकलाकार म्हणून गौरीने अभिनयक्षेत्रातला आपला प्रवास सुरु केला होता. गौरीने याआधी ‘कुटुंब’, ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का-२’, ‘पांघरूण’ अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गौरीच्या अभिनयाची नेहमीच वाहवा करण्यात आली, तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावरील तिचा वावर पाहता चाहते ही तिच्याबद्दल जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. गौरीही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करताना दिसते. अशातच गौरीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने तिच्या नव्या घराबद्दल माहिती दिली आहे.
पाहा मांजरेकरांच्या लेकीने काय दिली गुडन्यूज (Mahesh Manjrekar Daughter story)
गौरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या आई-वडिलांबरोबर नवीन घरामध्ये गृहप्रवेश करताना दिसत आहे. तर त्यांनी या घराचं वास्तुपूजनही केलं. यावेळी गौरीचा पारंपरिक लूक पाहायला मिळतोय. तिने तिचे आई-वडील व नातेवाईक यांच्याबरोबर या नवीन घराची पूजा करतानाचे खास क्षण व्हिडीओच्या मार्फत चाहत्यां सोबत शेअर केले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने घर आणि रेड हार्ट असे दोन इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहेत.(Mahesh Manjrekar Daughter story)
हे देखील वाचा – ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ खुद्द अशोक मामांनीच केला खुलासा
गौरीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
