“कुठे दाद मागावी?” नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत वैभव मांगलेंचा संताप

Vaibhav Mangle Post
Vaibhav Mangle Post

मराठी नाटकांना नेहमीच प्रेक्षकांची गर्दी असते आणि त्यामुळेच अनेकदा नाट्यगृहांबाहेर हाउसफूलचा बोर्ड पाहायला मिळतो. सद्या राज्यात आणि देशाबाहेर अनेक मराठी नाटकांचे प्रयोग रंगत आहेत. काहींनी तर प्रयोगाची शतकी गाठली आहे. तर काही नाटकं पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांचं लक्ष्य वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे अनेक कलाकार सद्या नाटकांच्या दैऱ्यांवर असल्याचे बघायला मिळत आहे. परंतू सध्या नाट्यगृहांमद्ये वेगळच चित्र पाहायला मिळत आहे. नाट्यगृहांमध्ये गैरसोय होते अशा कित्येक तक्रारी कलाकारांकडून ऐकायला मिळतात. नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत आता अभिनेता वैभव मांगलेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी दर्शवल आहे. (Vaibhav Mangle Post)

सध्या वैभव मांगलेंच संज्या छाया या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसा मिळत आहे. मात्र एकीकडे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उत्तरत असतान दूसरीकडे नाट्य गृहांमधील गैरसोयींमुळे संज्या छायाचे दोन प्रयोग रद्द करण्यात आल्याने अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. वैभवने पोस्ट मध्ये लिहीले आहे की “एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला”. याबाबत आलेला अनुभव सांगताना वैभव यांना राग अनावर झाला. ते म्हणाले, “पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती”.

पहा काय म्हणाले वैभव मांगले

“रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, अनावर झाला. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हालाही त्रास होतच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाही. (Vaibhav Mangle Post)

हे देखील वाचा – अभिनेता श्रेयस तळपदेचं साउथमध्ये पदार्पण, झळकणार मुख्य नायकाच्या भूमिकेत

आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. या सगळ्यावर काय बोलावं?” प्रचंड उकाड्याचा त्रास कलाकारांसह नाट्यरसिकांनाही सहन करावा लागला.. असं म्हणत वैभव मांगलेंनी त्यांची नाट्यगृहांप्रति नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Samir Choughule MHJ
Read More

हास्य जत्रेतील ‘त्या’ कृत्या साठी समीर चौघुलेंकडून जाहीर माफी

अंकिता आणि ओंकार मधील अफेअरच्या चर्चांना आलंय पुन्हा एकदा उधाण, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा. महाराष्ट्राची हास्य जत्रा…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…