रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलांच्या ‘गे’ रिलेशनशिपवर दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे मोठं वक्तव्य

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 8, 2023 | 12:54 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Mahesh Manjrekar on Gay Relationship

Mahesh Manjrekar on Gay Relationship

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबर सिनेमा निर्मितीक्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आजवर अनेक सिनेमांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदी व अन्य भाषिक सिनेमेही केल्या आहे. महेश सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी असून नुकतंच त्यांनी निर्मिती केलेली ‘एका काळेची मणी’ ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.

सिनेमांव्यतिरिक्त महेश मांजरेकर आपल्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत आलेले आहेत. आता याच वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलांबाबत मोठं विधान केलं, ज्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर समलैंगिक संबंधांबाबत बोलताना म्हणाले, “आपण प्रत्येक नातं स्वीकारलं पाहिजे आणि त्या प्रत्येक नात्याचा सन्मान केला पाहिजे. एक असा काळही होता, जेव्हा समाज अशा लोकांना त्यांची नाती स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळं आत्यहत्येच्या घटना घडत होत्या. पण आज हे चित्र बदललंय, त्यांना आपण स्वीकारतोय. माझ्या मुलानं येऊन मला सांगितलं की तो ‘गे’ रिलेशनशीपमध्ये आहे, तर मी त्याचा सहज स्वीकार करेन. कारण ती त्याची निवड आणि त्याचं आयुष्य आहे, त्याला हवं तसं आयुष्य जगू देईल. माझ्या मुलीनं जरी हे मला सांगितलं तरी ते मी स्वीकारेन.”

दे धक्का, पांघरूण, लालबाग परळ, नटसम्राट अश्या अनेक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त असून या सिनेमात बॉलीवूड स्टार अक्षय कुमारसह अनेक मराठी अभिनेते दिसणार आहेत.

Tags: entertainmentgaygay relationshipits majjamahesh manjrekarmarathi actressmarathi malikamarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Sukanya Mone

"संजयच्या त्या कमेंटमुळे मी ऑस्कर जिंकले"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.