मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अभिनयाबरोबर सिनेमा निर्मितीक्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आजवर अनेक सिनेमांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदी व अन्य भाषिक सिनेमेही केल्या आहे. महेश सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी असून नुकतंच त्यांनी निर्मिती केलेली ‘एका काळेची मणी’ ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.
सिनेमांव्यतिरिक्त महेश मांजरेकर आपल्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत आलेले आहेत. आता याच वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलांबाबत मोठं विधान केलं, ज्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर समलैंगिक संबंधांबाबत बोलताना म्हणाले, “आपण प्रत्येक नातं स्वीकारलं पाहिजे आणि त्या प्रत्येक नात्याचा सन्मान केला पाहिजे. एक असा काळही होता, जेव्हा समाज अशा लोकांना त्यांची नाती स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळं आत्यहत्येच्या घटना घडत होत्या. पण आज हे चित्र बदललंय, त्यांना आपण स्वीकारतोय. माझ्या मुलानं येऊन मला सांगितलं की तो ‘गे’ रिलेशनशीपमध्ये आहे, तर मी त्याचा सहज स्वीकार करेन. कारण ती त्याची निवड आणि त्याचं आयुष्य आहे, त्याला हवं तसं आयुष्य जगू देईल. माझ्या मुलीनं जरी हे मला सांगितलं तरी ते मी स्वीकारेन.”
दे धक्का, पांघरूण, लालबाग परळ, नटसम्राट अश्या अनेक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त असून या सिनेमात बॉलीवूड स्टार अक्षय कुमारसह अनेक मराठी अभिनेते दिसणार आहेत.