मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नालायक चित्रपट बघतोच मग…”, मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नाही पाहून भडकले महेश मांजरेकर, म्हणाले “आता हिंदीत डब करा कारण…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 16, 2023 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mahesh Manjrekar requests Marathi films dubbed in Hindi

"नालायक चित्रपट बघतोच मग...", मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नाही पाहून भडकले महेश मांजरेकर, म्हणाले "आता हिंदीत डब करा कारण..."

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘पांघरूण’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. केवळ मराठीच नाही, तर अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं असून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मनोरंजन क्षेत्रात वावरत असताना ते अनेकदा मराठी चित्रपटांबद्दल स्पष्ट मत व्यक्त करत आले, ज्याची बरीच चर्चा रंगते. (Mahesh Manjrekar requests Marathi films dubbed in Hindi)

महेश मांजरेकर यांनी नुकतेच नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ हे दोन चित्रपट पाहिले. ज्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. शिवाय, मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नसल्याची खंत व्यक्त करताना मराठी चित्रपट देशभरात पोहोचण्यासाठी हिंदीमध्ये डब करण्याची विनंतीसुद्धा त्यांनी केली. नुकतंच महेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी मराठी चित्रपटांबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी या व्हिडिओला “नालायक चित्रपट बघतोच आपण. त्याबरोबर ‘नाळ २’ आणि ‘श्यामची आई’ पण बघुयात ना! अप्रतिम आहे.” असं कॅप्शन दिलं आहे.

ते या व्हिडिओत म्हणाले, “नुकतंच मी ‘नाळ २’ आणि ‘श्यामची आई’ चित्रपट पाहिला. इतके अप्रतिम चित्रपट आहेत की मराठी चित्रपट इतका चांगला बनतो, याचा मला अभिमान वाटला. मला एका गोष्टीचं मात्र वाईट वाटलं, ते म्हणजे आपले मराठी चित्रपट पाहायला फार कमी प्रेक्षक येतात. मला याचं कारण कळलं नाही, म्हणजे तुम्हाला चांगला चित्रपट पाहायचा किंवा भाषेचा फरक पडत नाही, वगैरे. खरंतर महाराष्ट्रात इतके अप्रतिम चित्रपट बनतात, पण कोणी प्रेक्षक येत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की ज्याचं नशीब वाईट असेल, त्याच्या नशिबातच हा चित्रपट नाही. प्रसिद्ध इराणी फिल्ममेकर माजिद माजिदी ज्यांनी उत्तम चित्रपट बनवले, त्यांचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. जर त्यांनी हा चित्रपट पहिला, तर नक्कीच त्यांना अभिमान वाटेल.”

हे देखील वाचा – “डोक्यावर मारायला…”, चाहत्याला फटकावल्यानंतर दिग्दर्शकाचं भाष्य, तर नाना पाटेकरांनी भलतंच दिलं स्पष्टीकरण, नक्की खरं कोणाचं?

पुढे ते म्हणाले, “सध्या कांतारा, पुष्पा, RRR सारखे अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब होतात आणि ते हिट होतात. माझी सर्व मराठी निर्मात्यांना एकच विनंती आहे की, त्यांनी आपले चित्रपट हिंदी किंवा अन्य भाषेत करावे. तर ‘नाळ २’ चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “‘नाळ २’ हा देशभरातील प्रेक्षकांनी बघितला पाहिजे. ज्यातील तीन लहान मुलांनी खूप सुंदर काम केलं. आणि मला आशा आहे, जर उद्या या चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकने मिळाली, तर यातील त्या ‘चिमी’ला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार न देता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात यावा. कारण, प्रत्येक कलाकार हा कलाकारच असतो. त्याचबरोबर मी ‘श्यामची आई’ नावाचा वेगळ्याच धाटणीचा चित्रपट पहिला. मराठी चित्रपट काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहेत.”

हे देखील वाचा – Video : जंगलात रात्री असे शूट होत आहेत ‘सातव्या मुलीची…’मधील सीन, नेत्रा-इंद्राणी आगीमध्ये अडकल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

“त्यामुळे माझी सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती आहे, की तुम्ही आपले चित्रपट पाहा. असं म्हणणं नाही, तुम्ही सरसकट सर्वच चित्रपट पाहिलेच पाहिजे. पण ज्यावेळेला एखादा चांगला चित्रपट येतो, तेच तुम्ही त्याला पाठिंबा दिला पाहिजे. मला हे दोन्ही चित्रपट पाहताना अभिमान वाटला होता की, अरे आपला मराठी चित्रपट इतका उत्कृष्ट बनला. मी पुन्हा एकदा मराठी निर्मात्यांना विनंती करतो की, जर तुम्हाला वाटतं की, तुमचा चित्रपट चांगला आहे. तर तो चित्रपट हिंदीत डब करून देशभरात प्रदर्शित करावा. आपला मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत आज कुठे आहे, हे सर्वांना कळलं पाहिजे.”, असं महेश या व्हिडीओमध्ये म्हणाले.

महेश यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून कलाकारांसह अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिनेता जितेंद्र जोशीने यावर कमेंट करत त्यांचे आभार मानले. सध्या ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचे दिग्दर्शनात व्यग्र असून यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.

Tags: mahesh manjrekarMahesh Manjrekar requests Marathi films dubbed in Hindimarathi filmsnaal 2 movieshyamchi aai
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Mitali Mayekar Answers To Fans

"मर्सिडीज घ्यायची ना", नव्या कारवरुन मिताली मयेकरला ट्रोल करणाऱ्याशी चाहत्यांनी घातला वाद, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "तुमचा गोंधळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.