यंदाची दिवाळी मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर यांच्यासाठी खास होती. कारण मिताली व सिद्धार्थने यंदाच्या दिवाळीचं औचित्य साधत मिताली व सिद्धार्थने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. सिद्धार्थ-मितालीने नवी कोरी एकत्र मिळून आलिशान गाडी खरेदी केली. ही गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केली. मितालीने सोशल मीडियावरून गाडीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच सिद्धार्थने ही गाडीबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावरून पोस्ट केले होते. (Mitali Mayekar Answers To Fans)
मितालीच्या या गाडीच्या पोस्टवरील कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी नव्या गाडीबद्दल तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी नव्या गाडीवरून ट्रोलही केलं. एका नेटकऱ्याने मितालीच्या पोस्टवर “मर्सिडीज घ्यायची ना.”, अशी कमेंट केली. मितालीच्या पोस्टवरील ही कमेंट विशेष चर्चेत आली आहे. या कमेंटवर उत्तर देत मिताली म्हणाली, “माझा तेवढा बजेट नव्हता. पण पुढच्या वर्षी नक्की घेईन”. मितालीच्या या उत्तराची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
मितालीने दिलेल्या या उत्तरावरून तिच्या चाहत्यांमध्ये आणि तिला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये भांडण जुंपलं असल्याचं पाहायला मिळालं. मितालीने दिलेल्या कमेंटवरून चाहत्यांनी ट्रोलर्सला खडेबोल सुनावले. त्यावरून नेटकरी व चाहत्यांमध्ये चांगलीच भांडणं झालेली पाहायला मिळाली. मितालीच्या पोस्टमधील कमेंट सेक्शनमध्ये रंगलेल्या या वादावर अखेर मितालीने प्रतिकिया देत हा वाद संपवला. “dm नावाचा प्रकार ऐकला आहे का, कृपया तिकडे तुमचा गोंधळ घाला” अशी कमेंट केली आहे.

सिद्धार्थ व मिताली ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. नेहमीच ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रील्समुळे, फोटोशूटमुळे चर्चेत असणाऱ्या या जोडीच्या अनेकदा चर्चा रंगत असल्या, तरी दोघांचे बॉण्डिंग त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. या दोघांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला त्यांचे चाहतेच उत्तर देऊन त्यांची बोलती बंद करतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मितालीने त्याला राडो या कंपनीचं महागडं घडयाळ गिफ्ट दिलं. लाखोंच्या घरात असणाऱ्या या घड्याळ्याच्या किमतींवरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं.