लहानपणी चोर पोलीस हा खेळ आपण सगळ्यांनीच खेळला असेल. या खेळात जेव्हा पोलीस व्हावं लागायचं तेव्हा हातालाच बंदूक बनवून स्वतःच ‘ ढिशक्यांव ‘ असा आवाज काढून गोळी सुटायची. पण हातातून गोळी सुटणं हे अश्यकच आहे हे मोठं झाल्यावर समजत आणि आपल्या बालपणाच्या आठवणीवर आपण स्वतःच हसायला लागतो.
पण अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य केली ती मराठी चित्रपट सृष्टितील दिगदर्शक, अभिनेते महेश कोठारे यांनी. मराठी चित्रपटांच्या निर्मिती, दिगदर्शनात वेगळं अस्तितव निर्माण केलं ते एकापेक्षा एक धडाकेबाज चित्रपट देणारे महेश कोठारे आज अनेक हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात.(Laxmikant Berde shooted himself)
तर मंडळी विषय होता हातातून गोळी मारणं हे काम शक्य करून दाखवणं आणि ते करून दाखवलं होत महेश कोठारे यांनी त्यांच्या धडाकेबाज या चित्रपटात. महेश हे नाव ऐकलं कि लक्ष्या हे नाव आपसूकच येत. लक्ष्या आणि महेशच्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं आहे. या जोडीचं हिट होण्याचं एक कारण म्हणजे त्यांची कामाप्रतीची त्यांची आत्मयिता. एखादा सीन हवा तास होण्यासाठी अगदी स्वतःच्या जीवाची ही काळजी न करणारी ही जोडी एकामागे हिट चित्रपटांनी चंदेरी दुनिया समृद्ध केली. बहुचर्चित धडाकेबाज चित्रपटाचा एक प्रसंग महेश कोठारे यांनी सांगितला आहे. चित्रपटातील गाणं शूट करत असताना गाणं संपत आणि दरोडेखोर येतात त्यांना मारण्यासाठी लक्ष्या गंगारामला बोलवतो आणि गंगाराम सगळ्यांना बंदुका देतो पण लक्ष्याला मात्र सांगितलं जात कि तू फक्त बोट पुढे कर गोळी निघेल.(Laxmikant Berde shooted himself)
आणि या सीन मागे असणार महेश यांचं डोकं असं होत कि लक्ष्याच्या कॉस्ट्यूम मधून एक नळी टाकून ऍक्शन म्हणल्यावर बोटांजवळून गोळी फायर होणार होती आणि झालं ही तसंच, सीन ओक्के झाला महेश यांनी लक्ष्या परफेक्ट म्हणून कौतुक देखील केलं पण लक्ष्या म्हणाला महेश थांब महेश कोठारे यांनी जवळ जाऊन पाहिलं तर लक्ष्याचा हात रक्तबंबाळ झाला होता फक्त आवाज आणि धुरर झाला गोळीचा स्फोट मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातातच झाला.
आधी लगीन कोंढाण्याचं…(Laxmikant Berde shooted himself)
हे पाहून थक्क झालेल्या महेश यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना गाडीतून दवाखान्यात गेले योग्य उपचार केले त्या नंतर या दोघांमध्ये झालेलं संभाषण मात्र महेश कोठारे यांना भावुक करून गेलं. उपचार झाले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एवढी गंभीर दुखापत झालेली असूनसुद्दा लक्ष्मीकांत महेश कोठारे यांना म्हणाले आरे महेश उद्याच्या शूट च काय. हे ऐकून मी मात्र भारावलो असं देखील पुढे महेश यांनी सांगितलं.(Laxmikant Berde shooted himself)
दिगदर्शकाला हवं ते मिळावं आणि आपल्या मेहनतीचं फळ मोठ्या पडद्यावर दिसावं यासाठी कलाकार झटत असतो आणि त्याची मेहनत तो जगात नसला तरी प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करतो हे सगळ्यांच्या लाडक्या लक्ष्याच्या या प्रसंगावरून लक्षात येत.