Mahesh Kothare House : सर्वसामान्यांप्रमाणे प्रत्येक कलाकारचंही घराचं स्वप्न असतं. घर घेतल्यानंतर ते आपल्याला हवं तसं बनवणं आणि त्या घराला घरपण देणं हा मोठा टास्क असतो, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची स्वतःची घर घेण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत. मात्र या कलाकारांची घर नेमकी आतून कशी आहेत. त्यांच्या घराचं इंटेरिअर कसं आहे हे पाहणं चाहत्यांना अधिक उत्सुकतेचं वाटतं. अशातच प्रेक्षकांचे लाडके असे कलाकार महेश कोठारे यांचे घर नेमके आतून कसे आहे हे पाहण्यासाठी सारे उत्सुक असतीलच. कोठारे कुटुंब सिनेविश्वात कार्यरत आहेत. महेश कोठारे यांची सून, लेक दोघेही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. त्यामुळे या कोठारे कुटुंबाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावरही हे कोठारे कुटुंब बऱ्यापैकी सक्रिय असतं. बरेचदा ते त्यांच्या एकत्र कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. इतकंच नव्हे तर आदिनाथची लेक जिजाबरोबर घरात वेळ घालवतानाचेही फोटो ते शेअर करत असतात. महेश कोठारे यांच्या आलिशान घराची या सोशल मीडियावरील फोटोंवरुन झलक पाहायला मिळतेच.
महेश कोठारे यांचा मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज एरियामध्ये आलिशान फ्लॅट आहे. महेश कोठारे यांच्या घरात प्रवेश करताच सुंदर अशा देवघराने मन अगदी प्रसन्न होतं. हे त्यांचं देवघर महेश यांच्या आई जेनमा कोठारे यांनी सजवलेलं आहे. घराचं सर्व डेकोरेशन महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा यांनी केलेलं आहे. हॉलमध्ये प्रशस्त बैठक व्यवस्था असून एका कपाटात महेश कोठारे यांना मिळालेले पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. मुंबईत सहसा मोकळी जागा फारशी पहायला मिळत नाही.
आणखी वाचा – तब्बल पाच वर्षांनी ‘आई कुठे…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, मिलिंद गवळींनी शेअर केला व्हिडीओ
महेश कोठारे यांनी त्यांच्या घराला एक मोकळी आणि प्रशस्त जागा ठेवून तिथे सुंदर असं टेरेस गार्डन बनवलं आहे. या मोकळ्या जागेत छोटीशी बागही पाहायला मिळते. आंब्याच्या सीझनमध्ये तर कुंडीतील झाडाला आंबेही लागतात. गार्डन एरियाला जोडूनच एक प्रशस्त मोकळा हॉल आहे जिथे बर्थडे पार्टी वा एखाद कौटुंबिक सेलिब्रेशन केलं जातं. आदिनाथला टीव्ही बघायला आवडत नाही म्हणून पुस्तकांसाठी एक खास जागा त्याने बनवून घेतली आहे. तर जिजाच्या बेडरुममध्येही अनेक खेळणी पाहायला मिळत आहेत. सुंदर इंटिरिअर असलेलं हे त्यांचं किचनशिवाय अपूर्ण राहील, तर कोठारे कुटुंबाला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. बरेचदा महेश कोठारे स्वतः स्वयंपाक करताना दिसतात. त्यांचे मॉड्युलर किचन खूपच लक्षवेधी आहे.