Sukanya Mone Shared Incident : नुकतीच ‘झी मराठी’ वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘झी गौरव अवॉर्ड २०२४’मध्ये जुन्या मालिकेच्या कलाकारांनादेखील आमंत्रित केल्याचे पाहायला मिळाले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांना मंचावर आमंत्रित केले गेल्याचे पाहायला मिळालं. या मालिकेतील सर्व कलाकार या मंचावर आल्यानंतर ‘आभाळमाया’चे शीर्षकगीत लावण्यात आले. यावेळी काही कलाकारांचे डोळे पाणावलेले दिसले, तर उपस्थित इतर कलाकारांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. ‘आभाळमाया’ ही मालिका मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांसाठीच नाही तर प्रेक्षकांनासुद्धा तितकीच जवळची आहे.
यावेळी उपस्थित मालिकेच्या टीमसह मंदार देवस्थळी यांनी या मालिकेच्या गाजलेल्या एपिसोडची आठवण काढली. आभाळमायाचे ५३ व ५४ हे दोन एपिसोड खूप गाजले. या एपिसोडचं ११ पानांचं स्क्रिप्ट दोन दिवस दोघांवरच चित्रित झालं. हे स्क्रिप्ट जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा सेटवर १५ मिनिटं सगळेच शांत झाले होते. त्या सीनमध्ये सुधा रात्री ९ वाजता शरद जोशीला घराबाहेर काढते, असं दाखवण्यात आलं आहे.
आणखी वाचा – पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…
या सीनचा प्रेक्षकांवर खूप परिणाम झाला होता, असेदेखील यावेळी सुकन्या मोने सांगतात. या सीन दरम्यानची आठवण सांगत सुकन्या यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाली, “या सीनच्या शूटवेळी मनोज जोशीला कुठेतरी लग्नाला जायचं होतं म्हणून त्याची बायको चारु तिथे सेटवर आली होती. तो सीन बघत असताना तिने मध्येच मनोजला घरी जाण्यासाठी बोलावले. आपण लग्नाला नाही, घरी जाऊ म्हणत ती मनोजला तिथून घेऊन गेली. या सीनचा इतका तिच्या मनावर परिणाम झाला होता”.
आणखी वाचा – अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…
पुढे त्या म्हणाल्या, “इतकंच नाही तर तिने रात्री २ वाजता मला फोन केला. ‘तुझं आणि मनोजचं खरंच काही नाही आहेत?’. ‘मी म्हणलं असं का विचारतेस चारू? आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना’. त्यावर ती म्हणाली , ‘म्हणूनच मला टेन्शन आलंय की माझी चित्रा नाही ना करणार तुम्ही?’. म्हणजे इतका तिच्या मनावर या गोष्टीचा परिणाम झाला की ती लग्नालाही गेली नाही, १ आठवडाभर तिच्या मनावर तो परिणाम होता की खरंच या दोघांचं काही चालू नाही ना?”. आभाळमाया या मालिकेतली चित्रा हे पात्र सुधाची सवत होती. ती तिची खास मैत्रीणही होती. तिच्या मृत्यूनंतर शरदने सुधाशी लग्न केले होते. त्यामुळे निश्चितच हा सीन पाहताना मनोज जोशी यांची पत्नी अस्वस्थ होती.