दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार महेश बाबू आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. महेश बाबूने आपल्या दमदार अभिनयाने दक्षिणात्य चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली असून अभिनयक्षेत्रासह त्याच्या समाजकार्यामुळेही तो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. (Mahesh Babu Birthday)
तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शिवराम कृष्ण घट्टमनेनी यांचा मुलगा असलेला अभिनेता महेश बांबूचा जन्म चेन्नई येथे ९ ऑगस्ट १९७५ रोजी झाला आहे. घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या या अभिनेत्याला या क्षेत्राची प्रचंड आवड निर्माण झाली होती. महेश बाबूने बालकलाकार म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
एकूण ८ चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारल्यानंतर १९९९ मध्ये ‘राजकुमारूडू’ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे, त्या चित्रपटासाठी महेशला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा नंदी पुरस्कार मिळाला होता. अभिनेता महेश बाबूने आतापर्यंत २७ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यातील काही चित्रपटांनी चांगली कमाई केली. त्याने आपल्या कारकिर्दीत नंदी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
हे देखील वाचा – ‘तारक मेहता…’च्या सेटवर अरेरावी, जेठालालवर निर्मात्यांनी फेकली होती खुर्ची, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ही दुखापत…”
अभिनेता महेश बाबू अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. महेश बाबू एंटरटेन्मेंट नावाने त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. त्यामार्फत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिवाय सामाजिक कार्यातही महेश बाबू नेहमीच अग्रेसर असतो. त्याने आजवर अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत केली आहे. त्याचबरोबर दोन गावेही अभिनेत्याने दत्तक घेतली आहेत. दरम्यान, अभिनेता महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरबरोबर लग्न केलं. दोघांना गौतम व सितारा ही दोन मुलं आहेत.
हे देखील वाचा – Don 3 Teaser : हातात सिगारेट, डॅशिंग लूक अन्…; ‘डॉन ३’चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित, रणवीर सिंगवर प्रेक्षक नाराज
हे देखील वाचा – बॉलिवूडला आणखी एक दुःखद धक्का, सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं निधन
तर त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलाचं झाल्यास तो दिग्दर्शक त्रिविक्रम यांच्या ‘गुंटूर करम’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. त्यानंतर महेश बाबूने ‘RRR’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचं सांगितलं होतं.