सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं सामाजिक भान, ट्रिपला गेल्यानंतर लावली झाडं, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Team Planting

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांचं सामाजिक भान, ट्रिपला गेल्यानंतर लावली झाडं, फोटो व्हायरल

कलाकार मंडळी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून कुटुंबाबरोबर तर कधी मित्र परिवाराबरोबर वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरुन ते त्यांच्या चाहत्यांसाठी याबाबतचे नेहमीचे अपडेट करत असतात. अशातच प्रेक्षकांचा लाडका व लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’मधील कलाकार सध्या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत एकत्र फिरायला गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात उष्णतेचं प्रमाण वाढलं असल्याने या उष्णतेपासून सुटका व्हावी म्हणून काहीसा वेळ काढत ही कलाकार मंडळी अलिबाग येथे फिरायला गेलेली पहायला मिळत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Team Planting)

अलिबाग येथे एका गावात ते एन्जॉय करतानाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान ही कलाकार मंडळी सध्या एकत्र असून एन्जॉय तर करत आहेतच याशिवाय आता त्यांच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. वनिताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये वनितासह तिचा नवरा सुमित लोंढे, रोहित माने आणि त्याची बायको, रसिका वेंगुर्लेकर आणि तिचा पती सनी शिंदे, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. ही कलाकार मंडळी केवळ फिरण्यासाठी वा धमाल-मस्ती करण्यासाठी नव्हेतर निसर्गाला काहीतरी मदत व्हावी म्हणून मेहनत ही घेताना दिसत आहेत. त्यांनी अलिबाग येथे जाऊन वृक्षारोपण केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सायली-प्रतिमाचं नातं येणार समोर?, किल्लेदारांची लेक असल्याचं सत्य समजणार का?, रविराज मुलगी म्हणून करणार का स्वीकार?

View this post on Instagram

A post shared by Dhruvesh K (@vanola_a_homestay)

अलिबाग येथे फिरायला गेलेले असताना त्यांनी राहिलेल्या होम स्टेजवळ असलेल्या बागेत वृक्षारोपण केलं आहे. यावेळी अत्यंत आनंदाने व निरागस मनाने ही कलाकार मंडळी बागेत मेहनत घेताना दिसली आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Video : असं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नवीन घर, घरात स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, नावाच्या अनोख्या पाटीनेही वेधलं लक्ष

वनिताने शेअर आधी केलेल्या फोटोमध्ये ही कलाकार मंडळी एकत्र धमाल करताना दिसली. यावेळी गरमीपासून बचाव म्हणून नारळपाणी पिताना दिसली. सध्या ही मंडळी अलिबाग येथील चौल गावात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हास्यजत्रेतील सगळीच कलाकार मंडळी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. परदेशवारीमध्ये ही ते एकत्र फिरताना दिसले आहेत.

Tags: maharashtrachi hasyajatramaharashtrachi hasyajatra team alibaug tripmaharashtrachi hasyajatra team plantingmarathi actormarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi actress Hemangi Kavi expressed her reaction to the serial's title song through a post

"मालिकांच्या चढाओढीमुळे शीर्षकगीतांचा बळी…’’, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "एक एक सेकंदही…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.