देश-विदेशातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पाहिला जाणारा प्रसिद्ध कॉमेडी शो म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या शोने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. शोमध्ये साकारण्यात आलेल्या पात्रांची आज एक वेगळीच फॅन फॉलिविंग आहे. याचं कारण आहे ते दमदार विनोदी स्किट्स आणि त्या स्किट्सचे कलाकारांनी केलेलं अफलातून सादरीकरण. शिवाय पडद्यामागे असलेल्या लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची मेहनतही दिसून येते. (Maharashtrachi Hasyajatra)
याच हास्यजत्रेत एक पात्र आहे, जे प्रेक्षकांचं तुफान आवडतं बनलेलं आहे. ते म्हणजे ‘लोचन मजनू’ आणि हे पात्र साकारलं आहे अभिनेता समीर चौघुले याने. स्किटमध्ये लोचन मजनू मनोमिलन आणि अवीट रागिणी यांच्या कार्यक्रमाचा ५०० व्या प्रयोगात नेहमीच अडथळा आणतो, ज्यामुळे हा कार्यक्रम होत नाही. पण त्याच्या या विचित्र बोलण्याचे आणि विनोदी अंदाजाचे प्रेक्षक दिवाने झाले आहे. शिवाय या पात्रावर बनलेले अनेक मीम्स आणि रील्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. (Samir Choughule)
याच लोचन मजनूने म्हणजे अभिनेता समीर चौघुलेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये समीर लोचन मजनूच्या गेटअपमध्ये दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत समीरने “मनोमिलन स्वरछेडे आणि अवीट रागिणी यांचा ५०० वा प्रयोग सुरळीत व्हायला हवा का? ..काय वाटतंय तुम्हाला…?”, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना विचारला आहे.
हे देखील वाचा – हास्यजत्रेच्या नव्या पर्वात दिसणार का ओंकार भोजने? चाहत्यांची जोरदार मागणी, कमेंट करत म्हणाले, “आम्हाला ओंकार भोजने..”
समीरच्या या फोटो पोस्टवर चाहते भन्नाट कमेंट करताना दिसत आहे. एक चाहता यावर म्हणतोय, “करून तर बघा, मी आमरण उपोषण करेन तुमच्या घराबाहेर, जर अस झालं तर. लोचन मजनू झिंदाबाद.” तर अन्य एक चाहत्याने म्हटलंय, “वेगेपूरकर यांना त्या कार्यक्रमाचे अँकरिंग करायला द्या म्हणजे दोन्ही गायकांना लोचन मजनुची किंमत कळेल…तुफान स्क्रिप्ट होईल लोचन मजनू + वेगेपूरकर + दोघे गायक = राडा”. अनेकांनी गीतझंकारचा ५००वा प्रयोग न व्हावा, असं म्हटलेलं आहे. (Samir Choughule Lochan Majnu MHJ)
हे देखील वाचा – सहकुटुंब हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ पुन्हा एकदा सज्ज ! या दिवशी येणार प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम, प्रोमो समोर
हास्यजत्रेतील या पात्रावर आणि स्कीटवर प्रेक्षकांचे नेहमीच भरभरून प्रेम मिळते. आता हास्यजत्रा छोट्याश्या ब्रेकनंतर लवकरच छोट्या पडद्यावर परतणार असून चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे.