आपल्या तुफान विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा लाडका कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. तुफान विनोदी स्किट्स, कलाकारांचे अफलातून टायमिंगचे तर प्रेक्षक दिवाने झालेच. त्याचसोबत स्किट्समध्ये असलेलं वेगळेपण व विविध मुद्द्यांवर विनोदी अंदाजात केलेलं दमदार सादरीकरण यांमुळे हा कार्यक्रम अनेकदा टीव्ही व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिला जातो. (Maharashtrachi Hasyajatra)
गेल्या काही दिवसांपासून ‘हास्य जत्रा’ कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर थोडासा ब्रेक घेतला होता. तेव्हा कार्यक्रमातील काही कलाकारांनी नाशिक व अमेरिकेचे दौरे केले होते. त्यांच्या या सर्व प्रयोगांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. देश-विदेशातील दौरे गाजवल्यानंतर आता प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम पुन्हा एकदा छोट्या पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला असून ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ येत्या १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Maharashtrachi Hasyajatra returns new promo out)
पहा ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा नवा प्रोमो (Maharashtrachi Hasyajatra returns)
सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर हा नवा प्रोमो समोर आला. ज्यामध्ये हास्य जत्रेतील कलाकार ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, दत्तू मोरे, वनिता खरात व समीर चौघुले दिसत आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार यंदाचे पर्व “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या!” असं असणार आहे. हा नवा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून या प्रोमोवर नेटकरी लाईक्स व कमेंट्स देत आहे.
हे देखील वाचा : जेव्हा एका महिन्यांनी सासूबाईंनी केले वनिताचे लाड, स्टोरी पोस्ट करत म्हणाली, “एका महिन्यानंतर..”
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. विनोदी स्किट्स व कलाकारांच्या आगळ्यावेगळ्या शैलीसोबत प्राजक्ता माळीचं सूत्रसंचालन, जोडीला सई ताम्हणकर व प्रसाद ओकची उपस्थिती ही याची मुख्य ओळख बनलेली आहे. शिवाय लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी व टीमची पडद्यामागची मेहनत यांमुळे हास्य जत्रा प्रेक्षकांच्या जवळचा बनला असून लॉकडाउन काळात हा कार्यक्रम प्रत्येकासाठी एक सपोर्ट सिस्टीम बनला होता. आता हा कार्यक्रम पुन्हा येणार असल्याने प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहे. (Maharashtrachi Hasyajatra returns)