शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गुन्हेगार टॉयलेट करताना त्यांच्यासमोर उभा राहतो कारण…” समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “चार ते पाच दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2023 | 4:12 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sameer Wankhede Statement

Sameer Wankhede Statement

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या या कार्यक्रमाचे तिसरे पर्व चर्चेत आहे. अनेक राजकारणी, कलाकार मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमातील त्यांची वक्तव्ये तसेच त्यांच्या या मुलाखती विशेष लोकप्रियता मिळवतात. आता या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी उपस्थिती लावली. यादरम्यान त्यांच्याशी करण्यात आलेल्या बातचीत वरून अनेक प्रश्नांची उत्तर समोर आली. त्यांच्या मुलाखतीचे अनेक प्रोमो समोर येतं आहेत, यांतील एक प्रोमो पाहून हसू जरी आले असले तरी मुद्दा पाहता तो गांभीर्याचाच विषय म्हणावा लागेल.

मुख्यत्वे अमली पदार्थांचा शोध घेण्यात माहीर असलेल्या समीर वानखेडे यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, “परदेशातून कोकिन्स सारखे ड्रग्ज हे आणले जातात. तेव्हा गुन्हेगार ते ड्रग्ज कॅप्सूल मध्ये टाकून शरीरात त्याच सेवन करतात, सेवन करणं हा खरंच प्रॉब्लेम नाही आहे, तर ते शरीराबाहेर काढणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे प्रकरण एक दिवसात आटपतही नाही, त्याला चार पाच दिवस जातात. आणि आम्हाला त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्याकडून हे पदार्थ काढून घ्यावे लागतात. आणि शरीराबाहेर काढताना ही मीच त्यांच्या समोर उभा राहतो.” (Sameer Wankhede Statement)

हे देखील वाचा – “तुमचा स्वतःचा बियर बार होता?” प्रश्न विचारताच समीर वानखेडे भडकले, म्हणाले, “खाकी वर्दीत असलेल्या व्यक्तीने…”

View this post on Instagram

A post shared by ‘खुपते तिथे गुप्ते’ (@ekviraproductions)

हे देखील वाचा -प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, “त्यांनी मला पाहिलं अन्…”

शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बरंच गाजलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबियांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या सगळ्या प्रकरणात एक नाव बरंच चर्चेत आलं ते म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. समीर यांनी या प्रकरणामध्ये कारवाई केली होती. भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळं समीर वानखेडे अडचणीत आले होते. तसंच, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहित माझ्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी पत्रात लिहलं होतं.

हे देखील वाचा – सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात, दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोक म्हणतात, असा प्रश्न जेव्हा केला तेव्हा समीर म्हणाले, “आमच्यासाठी हे गुन्हेगार खूप लहान आहेत आणि त्यांचे नाव घेऊन मी त्यांना अजिबात फेमस करणार नाही. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाहीआणि मी त्यांना आव्हान देतो. तिथे परदेशात बसून धमक्या वगैरे देऊ नकोस हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या दे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Tags: avdhut guptekhupate tithe gupteSameer Wankhedesameer wankhede aaryan khan controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
prajakta mali farmhouse

काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा...; प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? कुटुंबासह केली धमाल-मस्ती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.