शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ओंकार भोजनेने ‘तू दूर का?’ गाणं गाताच भर कार्यक्रमात नम्रता संभेरावला कोसळलं रडू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 7, 2023 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
onkar bhojane video

Video : ओंकार भोजनेने ‘तू दूर का?’ गाणं गाताच भर कार्यक्रमात नम्रता संभेरावला कोसळलं रडू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला एक बहुगुणी कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार भोजने. या कार्यक्रमामध्ये विविध पात्र साकारत ओंकारने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडलं. ‘कोकण कोहिनूर’ म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. आता ओकांर या कार्यक्रमात दिसत नसला तरी प्रेक्षकांचं त्याच्यावर असणारं प्रेम कायम आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बऱ्याच कलाकार मंडळींबरोबर ओंकारचं जिव्हाळ्याचं नातं आहे. वनिता खरात, नम्रता संभेरावबरोबर असणारी त्याची मैत्री तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. आता या त्रिकुटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘एकदा येऊन तर बघ’ या चित्रपटामध्ये वनिता, ओंकार, नम्रता एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या तिघंही व्यग्र आहेत. नुकतंच मुंबईमधील रुईला महाविद्यालयामध्ये वनिता, ओंकार, नम्रता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. यावेळी महाविद्यालयामधील मुलांनी तसेच इतरांनी तिघांचंही जोरदार स्वागत केलं. तर ओंकारने यावेळी एक गाणं म्हटलं.

आणखी वाचा – …अन् छेड काढणाऱ्या चार जणांना प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बेदम मारलं, म्हणाली, “त्या पोरांना…”

ओंकारने त्याच्या अभिनयाने तर सगळ्यांना आपलस केलंच आहे. पण त्याच्या ‘तू अशी दूर का?’ या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं. प्रमोशनदरम्यानही ओंकारला हे गाणं गाण्याचा सगळ्यांनी आग्रह केला. सगळ्यांनीच हट्ट धरल्यानंतर त्यालाही राहावलं नाही. ओंकारने त्याच्या आवडीचं गाणं सादर करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्याचं गाणं ऐकून सगळ्यांनाच भरुन आलं.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “आपली लायकी काय?”, ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर नवऱ्याने केला डान्स, ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या ऐश्वर्या नारकर

याच गाण्याचा व्हिडीओ नम्रताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट केला आहे. ओंकारचं गाणं ऐकून नम्रताला मंचावरच रडू कोसळलं. गाणं झाल्यानंतर नम्रताने ओंकारच्या हातातील माईक स्वतःकडे घेत ”वा वा” असं म्हणत त्याचं कौतुक केलं. नम्रता व ओंकार या दोघांची मैत्री आपण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात पहिलीच आहे. या दोघांचं बॉण्डिंगही कमालीचं आहे. या व्हिडीओमधून पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचं दर्शन झालं.

Tags: maharashtrachi hasy jatramarathi actornamrata sambheraoonkar bhojane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Gaurav More Dance in London

Video : लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा शाहरुख खान स्टाइल डान्स, ओपन बसमधील व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.