‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. या विनोदी कार्यक्रमाने आजवर अनेक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अशातच या कार्यक्रमातील सर्वांचा लाडका कलाकार म्हणजे अभिनेता निखिल बने. आजवर निखिलने त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. निखिलचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. प्रत्येक स्किटमध्ये निखिल त्याच्या विनोदी शैलीने साऱ्यांना खळखळवून हसवायला भाग पाडतो. (Nikhil Bane Fan Moment)
कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचे चाहते हे आलेच. प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा चाहतावर्ग असतो. आणि कलाकारांनी हा चाहतावर्ग स्वतःच्या मेहनतीने तयार केलेला असतो. बरं अशातच कित्येकदा ही कलाकार मंडळी ही त्यांच्याबरोबरच्या इतर कलाकार मंडळींचे चाहते असतात. अनेकदा ते त्यांच्या फॅन मुमेंट शेअर करताना दिसतात. अशातच ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बनेने त्याची फॅन व त्याच्या क्रशबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
निखिल बनेने नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फॅन मुमेंट व त्याच्या पहिल्या क्रशबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी तो म्हणाला, “माझी क्रश पूजा सावंत आहे. आणि माझी फॅनही पूजा सावंतच आहे”. फॅन मुमेंटचा किस्सा सांगत निखिल म्हणाला, “माझ्या वाढदिवशी आमची नमा ताई म्हणजेच नम्रता संभेरावने माझ्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर ठेवला होता, आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पूजा आणि नम्रता ताई दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यावेळी ताईचं स्टेटस पाहून पूजाने सांगितलं की, माझ्याकडून निखिलला शुभेच्छा दे. आणि त्याला सांग की मला त्याचं काम खूप आवडतं.”
“मला मुळातच पूजा सावंत आवडायची हे ताईला माहित होतं, त्यामुळे तिने मुद्दाम त्यांच्या संवादाचा स्क्रिनशॉट काढून मला पाठवला. सुरुवातीला मला हे खरं वाटत नव्हतं, मात्र मला ताईनेच खात्री पटवून दिली. त्यानंतर प्रमोशननिमित्त एकदा पूजा आमच्या हास्यजत्रेच्या सेटवर आली होती.तेव्हा तीच स्वतः मला भेटायला आली आणि म्हणाली, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मला तुझं काम खूप आवडतं असं ती बोलताच यावर मी काय प्रतिक्रिया देऊ हे मला कळतंच नव्हतं. आणि मग आम्ही एकत्र फोटो काढला.”