सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोन ते अडीच हजार केस कापायला द्यायचो अन्…”, ‘आई कुठे…’मधील अनिरुद्धची पोस्ट, म्हणाले, “खूप मोठा प्रश्न…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2023 | 8:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Milind Gawali New Post

“दोन ते अडीच हजार केस कापायला द्यायचो अन्…”, ‘आई कुठे…’मधील अनिरुद्धची पोस्ट, म्हणाले, “खूप मोठा प्रश्न…”

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. आजवर मिलिंद यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळेच. मिलिंद यांचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नेहमीच ते कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. अशातच मिलिंद यांनी त्यांच्या रील लाईफमुळे त्यांच्या रिअल लाईफमध्ये त्यांना कोणत्या अडचणी येतात याबद्दल भाष्य केलं आहे. रील लाईफमुळे कित्येकदा या कलाकारांना त्यांच्या लाईफस्टाईमध्ये बदल करता येत नाहीत यावर ही त्यांनी पोस्ट करत भाष्य केलं आहे. (Milind Gawali New Post)

यावेळी मिलिंद यांनी केस कापतानाचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला असून, त्याखाली कॅप्शन देत त्यांनी म्हटलं आहे की,” केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे. नियमितता पाळणं हे सुद्धा कठीण काम असतं. मालिका करत असताना केस कधी कापायचे हा खूप मोठा प्रश्न असतो, सतत सीन्स चालू असतात त्यामध्ये जर तुम्ही केस कापले तर ते दिसायला वेगळाच दिसतं. मी ज्यावेळेला सिनेमे करायचो त्यावेळेला तर एक हेअर स्टाईल ही मला जवळजवळ वर्षभर तरी ठेवावी लागायची कारण सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत ती केसांची स्टाईल बदलता यायची नाही. त्यामुळे फक्त केस ट्रिम करत राहणे एवढंच करता यायचं, आणि मग खूप मोठा प्रश्न पडायचा की केस कापणाऱ्याला आपण काय सांगायचं, की आपल्याला कसे केस कापून हवे आहेत.”

आणखी वाचा – निखिल बनेचं झालं आहे ब्रेकअप, पहिल्यांदाच केलं भाष्य, क्रशबाबतही केला खुलासा, म्हणाला, “ती स्वतःहून मला भेटायला आली अन्…”

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

“त्यामुळे बरीच वर्ष मी माझे माझे केस स्वतः ट्रिम करायचो, आता स्वतःचे केस कापण्याचा इतका सराव झाला आहे की लॉक डाऊन मध्ये दर पंधरा-वीस दिवसांनी मी माझेच केस ट्रिम करत बसायचो, काही चुकलं तर भीतीच नसायची, तेव्हा केस कापायचा माझा छान सराव झाला. पण गेले तीन वर्षापासून मी ठाण्यात सागरकडे केस कापतो आहे, पण गेल्या तीन वर्षात मी त्याच्याकडे फक्त सहा वेळा गेलो आहे, मधल्या वेळेला मी माझे माझे केस स्वतः ट्रिम करतो, पूर्वी केस कापायला अगदी दोन हजार अडीच हजार रुपये पण द्यायचो.”

आणखी वाचा – Video : ऋतुजा बागवेने खरेदी केलेलं नवीन घर आतून नेमकं कसं आहे?, बेडरुम आहे फारच खास, पाहा व्हिडीओ

“घरी आपले केस कापायला बोलवण्याच्या ऐवजी मला स्वतः सलोनमध्ये जाऊन केस कापायला आजही छान वाटतं. सागरला या अनिरुद्धच्या केसांची स्टाईल इतकी चांगली पाठ झाली आहे की मला त्याला काहीच सांगावं लागत नाही, जाऊन फक्त खुर्चीत बसायचं आणि छानशी कॉफी पीत आपले केस कापून घ्यायचे. दोन-तीन महिन्यात हा एक छान अनुभव असतो.”

Tags: entertainmentmarathi actormarathi serialmilind gawalimilind gawali new postmilind gawali on lifestylestar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
NIkhil Bane Majja Polkhol

वनिताला म्हटलं खादाड, मोठा शहाणा कोण हेही सांगितलं?, निखिल बनेने 'हास्यजत्रे'च्या कलाकारांची केली पोलखोल, म्हणाला, "समीर दादा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.