प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न आहे, ते म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागतात. शिवाय, विविध अडचणींना नेहमीच सामोरे जावं लागतं. मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी स्वतःचं हक्काचं घर घेत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यामध्ये एक नाव सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे अभिनेत्री ऋतुजा बागवे. ऋतुजाने रंगभूमीपासून रुपेरी पडद्यावरील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ‘अनन्या’ या नाटकात तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्याचबरोबर मालिका व चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. (Rutuja Bagwe new Home)
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ऋतुजाने काही दिवसांपूर्वी मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. ती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. तिच्या गृहप्रवेशाचे अनेक फोटोज जोरदार व्हायरल झाले होते. अशातच, ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋतुजाने तिच्या नवीन घराची झलक दाखवली आहे.
हे देखील वाचा – “प्रत्येकाची आई अशी असते का?”, बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, साने गुरुजींच्या भूमिकेतील अभिनेत्याने वेधलं लक्ष
ऋतुजाच्या या नवीन घरात प्रवेश करताच पांढऱ्या फुलांची सुंदर नक्षीकाम केलेली, त्यावर ‘ऋतुजा प्रतिभा राजन बागवे’ असं संपूर्ण नाव असलेली नेमप्लेट सर्वांचे लक्ष वेधून घेते. घरात प्रवेश करताच घरातील एका भिंतीवर ‘विठ्ठल’ नावाची सुंदर कॅलिग्राफी एक वेगळं वातावरण निर्माण करते. त्याचबरोबर घरातील एका रूममध्ये रणबीर कपूरचा फोटो दिसून येत आहे. यावेळी तिने तिच्या घरात रणबीरचा फोटो लावण्यामागचं कारण सांगताना म्हणाली होती, “रणबीर कपूर हा माझा अत्यंत आवडता अभिनेता असून माझं त्याच्यावर प्रेम आहे, असा मला वाटतं. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा मला दिसावा, म्हणून मी त्याचा फोटो लावला आहे.”
तसेच, ऋतुजाने मुंबईजवळील ठाणे येथे घर येथे घेतले असून तिच्या या नवीन घरातील वातावरण देखील नयनरम्य आहे. तिने ठाण्यात घर का घेतले? हे सांगताना ती म्हणाली होती की, माझे मित्र-मैत्रिणी ठाण्यात राहतात आणि मी प्रचंड निसर्गप्रेमी आहे. त्यामुळे मी जेव्हा घर घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी माझं नवीन घर निसर्गाच्या सानिध्यात घेणार असल्याचं ठरवलं होतं.