‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या कार्यक्रमातील कलाकारही विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील कलाकारांचा ही खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. अशा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला दत्तू मोरे यांने त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अल्पावधीतच दत्तूने त्याच्या विनोदी अंगशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर ही दत्तू बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Dattu More Wife Gift)
विशेषतः दत्तू हास्य जत्रेशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अपडेटही शेअर करताना दिसतो. वर्षभरापूर्वीच दत्तू मोरे हा विवाह बंधनात अडकला. दत्तूने पेशाने डॉक्टर असणाऱ्या स्वाती घुंगरे हिच्याशी विवाह सोहळा केला. थेट प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली चाहत्यांसह शेअर केली. त्यानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिली. दत्तूने 23 मे रोजी लग्न गाठ बांधली. दत्तूच्या अगदी साधेपणाने केलेल्या लग्नाची ही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. नुकतंच दत्तूच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दत्तूने त्याच्या बायकोसह काही फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा देखील दिलेल्या पाहायला मिळाल्या. “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच छान एकत्र राहु आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत उम्म्म्मम गिफ्ट.?, लवकरच…” असंही गमंतीने म्हटलं आहे. या पोस्टनंतर आता दत्तूने त्याच्या बायकोने सरप्राईज गिफ्ट दिल्याचाही व्हिडीओ शेअर केला आहे. दत्तू मोरेला त्याच्या बायकोने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास महागडी अशी बाईक गिफ्ट केली आहे. शोरूम मध्ये बाईकबरोबरचा त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हे सरप्राईज गिफ्ट पाहून दत्तू खूपच खुश दिसत होता.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दत्तू आधी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करत होता. पण त्याच्या कलागुणांना ओळखून त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली. आणि दत्तूने त्या संधीच सोनं केलं.