शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या रात्री मी खूप रडलो आणि…” दत्तू मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “काम मिळत नसल्याचा त्रास…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 8, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Dattu More talk about his first entry in the show.

“त्या रात्री मी खूप रडलो आणि...” दत्तू मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “काम मिळत नसल्याचा त्रास...”

पहिली संधी ही प्रत्येकासाठीच महत्त्वाची असते आणि या संधीचे सोनं करणं ही त्याहून महत्त्वाचे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांसाठी ही पहिली संधी महत्त्वाची असून या अनेक कलाकारांनी या संधीचे सोनंही केलं आहे. असंच संधीचं सोनं करणारा अभिनेता म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये अनेक स्किट्समधून छोट्यामोठ्या भूमिका साकारत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

या शोमुळे दत्तू घराघरांत लोकप्रिय झाला असून त्याला आता वेगळी ओळखही मिळाली आहे. पण या शोमध्ये त्याला त्याच्या पहिल्या एण्ट्रीसाठी खूप संघर्ष करावा लागला होता आणि ही पहिली संधी जेव्हा त्याला मिळाली होती. त्या आदल्या रात्री अभिनेता रडला होता. त्याच्या या प्रसंगाबद्दल दत्तूने नुकतेच भार्गवी चिरमुले यांच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. या मुलाखतीत दत्तूने त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये स्किट सादर करण्याची पहिली संधी कशी मिळाली? याबद्दलही सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

यावेळी दत्तूने असं म्हटलं की, “या शोमध्ये येण्याआधीचा संघर्ष हा खूपच मोठा होता. अनेक एकांकिका व नाटकांमधून मी छोट्यामोठ्या भूमिका साकारत होतो. मग या शोमध्ये आल्यानंतर अनेक मोठ्या कलाकारांना अभिनय करताना बघत होतो. त्यामुळे आपल्यालाही अभिनय करण्याची संधी मिळावी असं वाटत होतं. मला पण यात छोटी एण्ट्री किंवा छोटी भूमिका करायची आहे हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे ज्यादिवशी मला ही संधी मिळाली त्याच्या आदल्या दिवशी मी खूप रडलो होतो.

आणखी वाचा – “आपल्याच लोकांशी आपला लढा”, दमदार डायलॉगबाजी असलेला ‘आम्ही जरांगे’चा ट्रेलर प्रदर्शित, सुबोध भावे, प्रसाद ओकचीही दिसली झलक

याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं की, “खूप दिवस काहीही होतं नव्हतं. संधी मिळत नव्हती याचा खूप त्रास होतो. त्यामुळे एके दिवशी रात्री खूप भरून आलं होतं. तेव्हाच निखिल बने व विनायक पुरुषोत्तम यांचा फोन आला आणि आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तेव्हा विनायकने स्किटमध्ये “वेटरची एण्ट्री आहे? करशील का?” असं सांगितलं. यावर मी खूप खुश झालो आणि लगेच त्याला होकार कळवला. मग विनायकने तिथून लगेच मोटे सरांना फोन करून माझ्याबद्दल सांगितलं आणि मग मोटे सरही “हो चालेल” असं म्हणाले.

आणखी वाचा – Video : देवेंद्र फडणवीसांच्या मागे बसलेली कंगणा रणौत, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने ‘खेळ मांडला’ गाणं लावत बनवला व्हिडीओ, म्हणाला…

यापुढे दत्तू असं म्हणाला की, “स्किटच्या दिवशी मी चार वाजता उठलो होतो आणि तयार होऊन आपल्याला आज करूनच दाखवायचं आहे असं ठरवलं. मग तांत्रिक सरावाच्या दिवशी मी गेलो आणि मग ते स्किट झालं. ते स्किटही सरांना आवडलं आणि त्यांनी कौतुकही केलं.”      

Tags: dattu moremaharashtrachi hasyajatramarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra Team

उन्हाळयाच्या सुट्टीसाठी अलिबागला पोहोचले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सुप्रसिद्ध कलाकार, गावामध्ये राहिले अन्…; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.