‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाची क्रेझ संपूर्ण जगभरात असलेली पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचेही जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे चेतना भट. हास्यजत्रेतील चेतनाचे स्किट्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. विनोदाच्या अनोख्या बाजाने अभिनेत्रीने स्वतःच स्थान टिकवून ठेवला आहे. चेतनाचे गौरव मोरे व समीर चौघुले यांच्याबरोबरचे तसेच नम्रता संभेराव व वनिता खरातबरोबरचे सासू-सूनेचे स्किट्स तसेच लोचन मजनू यांसारखे अनेक विनोदी स्किट्स चांगलेच लोकप्रिय आहेत. (Chetana Bhatt New Car)
सोशल मीडियावर चेतना बर्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेक ट्रेंडिंग रीलमुळेही अभिनेत्री चर्चेत असते. इतकंच नव्हेतर बरेचदा चेतना तिच्या नव्याबरोबर फिरतानाचे, परदेश दौऱ्याचे फोटो, व्हिडीओही शेअर करताना दिसते. सतत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या या अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चेतनाने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर करणारी पोस्ट शेअर केली आहे.
चेतना आणि तिच्या नवऱ्याचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. “आज एक स्वप्नं पूर्ण झालं. गाडी घेतली”, असं म्हणत त्यांनी ही खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. चेतना व तिचा नवरा मंदार याने गाडीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. गाडी घेतल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतानाही दिसला.
चेतना व मंदारने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. दोघांच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने, ऋतुजा बागवे, पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता माळी या कलाकारांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.