शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते विश्वेश्वर राव यांचे निधन, ६४व्या वर्षी अखेरचा श्वास, उपचार सुरु होते पण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 4, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
South Actor Visweswara Rao Death

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते विश्वेश्वर राव यांचे निधन, ६४व्या वर्षी अखेरचा श्वास, उपचार सुरु होते पण…

प्रसिद्ध सहाय्यक अभिनेते आणि कॉमेडियन विश्वेश्वर राव यांचे दीर्घ आजाराने मंगळवार २ एप्रिल रोजी निधन झाले. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर राव गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मीडियाच्या वृत्तानुसार, त्यांचे पार्थिव त्यांच्या चेन्नईतील सिरसेरी येथील निवासस्थानी जनतेसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काल सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (South Actor Visweswara Rao Death)

विश्वेश्वर राव हे आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील होते आणि वयाच्या ६४व्या वर्षी बालकलाकार म्हणून ओळख मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंब चेन्नईला स्थायिक झाले. त्यांची ‘पिठामगन’ या तामिळ चित्रपटात मंजूच्या वडिलांची (अभिनेत्री लैला) भूमिका नेहमीच आठवणीत राहिली. बाला यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘पिठामगन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथ, आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटने खरेदी केली महागडी कार, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव

विश्वेश्वर राव यांनी ३५० तमिळ व तेलुगु चित्रपटांमध्ये विनोदी कलाकाराच्या भूमिकेसाठी विशेष प्रशंसा मिळवली. १५० हून अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ चित्रपटच नाही, तर विश्वेश्वर राव यांचे कार्य टेलिव्हिजन मालिकांपर्यंतही आहे. त्यांच्या शानदार अभिनय कारकिर्दीत, विश्वेश्वर राव यांना एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वरा राव आणि एमजी रामचंद्रन यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली.

आणखी वाचा – “रंग लावायचा हक्क फक्त आशुतोषला…”, अनिरुद्धने अरुंधतीला रंग लावताच घडलं भलतंच, सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रोमो समोर

याशिवाय त्यांनी रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन आणि पवन कल्याण यांसारख्या अभिनेत्यांसह अभिनय केला. अनेक प्रसंगी, विश्वेश्वर राव यांनी एनटीआर, एमजीआर आणि जे जयललिता या तीन मुख्यमंत्र्यांसह काम केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

Tags: south actor deathSouth Actor Visweswara Rao Deathsouth industryVisweswara Rao passed away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Urvashi rautela instagram story

क्रिकेटर ऋषभ पंतच्या उंचीची उर्वशी रौतेलाने उडवली खिल्ली, प्रकरण वाढल्यानंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, "हे फक्त स्क्रिप्ट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.