शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या घरी यंदा दिवाळी उत्साहात, नातवाला उटणं लावताचा व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2023 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
arun kadam this Diwali celebrate with grandson

arun kadam this Diwali celebrate with grandson

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम हटके विनोदी शैलीसाठी बरेच प्रसिद्ध आहे. त्यांच्या विनोदाचा तर संपूर्ण महाराष्ट्र चाहता आहे. अरुण म्हणजे ‘महाराष्ट्राचे दादूस’ त्यांच्या घरात सध्या दिवाळीचा मोठा जल्लोष दिसत आहे. यावर्षी सगळ्या सणांप्रमाणे हा सणही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अरुण यांचा लेक म्हणजे सुकन्या हिच्या गोंडस बाळाची म्हणजेच अथांगची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे त्यांच्या घरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अरुण यांच्या नातवाचा अथांगचा उटणं लावतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(arun kadam this Diwali celebrate with grandson)

नरकचतुर्थीनंतरचा दिवस म्हणजे दिवाळी पहाट. यादिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीपूर्वी सुगंधीत उटण्याच्या लेप संपूर्ण अंगाला लावला जातो आणि त्यानंतर अंभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. नंतर गोडाचे पदार्थांनी दिवसाची सुरुवात होते. महाराष्ट्रात ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे. ती आजही तितकीच उत्साहात साजरी केली जाते. अशीच या दिवाळीच्या पहाटेची सुरुवात अरुण यांच्या घरी करण्यात आली. अरुण यांच्या नातवाची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे त्यांच्या घरात दिवाळीचा मोठा उत्साह आहे.

View this post on Instagram

A post shared by Athaang Sagar Powale (@athaang.sagar)

आणखी वाचा – “चिपळूणचा निवाजुद्दीन सिद्दीकी…”, अभिनेत्रीबरोबर प्रभाकर मोरेंचा रोमँटिक डान्स पाहुन नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “या वयात…”

शेअर केलेल्या व्हिडीओत अरुण यांची कन्या त्यांच्या नातवाला मांडीवर घेऊन बसलेली दिसत आहे. त्यानंतर अरुण यांच्या पत्नी वैशाली यांनी त्याला उटण्याचा टिळा लावला आणि नंतर संपूर्ण अंगाला उटणं लावलं. अरुणही नातवाला उटणं लावताना दिसले. त्यानंतर आंघोळीनंतर त्याला पांढऱ्या रंगाचा छान पोषाख परिधान करण्यात आला. अरुण यांच्या पत्नीने त्यानंतर त्याचं औक्षण केलं आणि अथांगला पहिल्या दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तूही दिली. अशा प्रकारे अरुण यांच्या नातवाची दिवाळी पहाट साजरी झाली.

View this post on Instagram

A post shared by Athaang Sagar Powale (@athaang.sagar)

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं स्वतःचं हक्काचं घर, बायकोने शेअर केला खास फोटो; म्हणाली, “आम्हाला जसा वेळ…”

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘अगं किती गोड, देवाची कृपा सदैव राहो’, असे कमेंट केले आहेत तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘बाळा अगदी आजोबांसारखंच आहे’, अशी कमेंट केली आहे.

Tags: arun kadamfame arun kadammaharashtrachi hasyajatra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Nivedita Saraf And Ashok Saraf Diwali Video

"सराफांच्या घरचा फराळ", निवेदिता सराफांनी स्वतःच्या हाताने बनवला खमंग फराळ, आस्वाद घेत अशोक मामा म्हणाले, "खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.