मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अरुण कदम अर्थात प्रेक्षकांचा लाडका दादूसवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे. अरुण कदम सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अरुण कदम त्यांच्या सिनेमा, मालिकेमुळं जितके चर्चेत असतात तितकंच त्यांच्या खासगी आयुष्यामुळंही ते चर्चेत आसतात. त्यांची पत्नी, मुलगीदेखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या लेकीने गेल्या वर्षी गूड न्यूज दिली होती. अरुण कदम यांच्या लेकीने गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी बाळाला जन्म दिला होता. अशातच नुकताच त्यांच्या नातवाचा पहिला वाढदिवस साजरा झाला आहे आणि त्यांच्या मुलीने याची खास झलक शेअर केली आहे.
अरुण कदम यांची मुलगी सुकन्या व तिच्या नवऱ्याने या व्हिडीओमध्ये त्यांच्या बाळाच्या एक वर्षाच्या प्रवासाचे वर्णन केलं आहे. तसंच अरुण कदम यांनीही त्यांच्या नातवाला खास शैलीत वाढदिवसाच्या जाम भारी शुभेच्छा दिल्या. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “सुकन्या माझी आयुष्यात आली. तेव्हापासूनचं माझं आयुष्य बदललं”. यापुढे त्यांची पत्नी असं म्हणाली की, “सुकन्यानंतर आमच्या घरी कुणी लहान मुलंच नव्हती आणि मग तीस वर्षांनी आमचा नातू आमच्या आयुष्यात आला. त्यामुळे तिने तिची गुडन्यूज सांगितली तेव्हापासूनच आम्ही उत्सुक होतो. त्यानंतर तिला मुलगा झाला हे ऐकलं तेव्हा आम्हाला स्वर्ग सुख काय असतं ते कळलं. काय करु आणि काय नको असं झालं” .
अरुण कदम यांच्या मुलीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अथांगच्या संपूर्ण वाढदिवसाच्या सलिब्रेशनची खास झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये अरुण कदम, त्यांची पत्नी, तसंच सुकन्या यांच्या सासू व सासऱ्यांनी वर्षभरात घालवलेले खास क्षणदेखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुकन्या व तिच्या नवऱ्याचे डोहाळ जेवणातील काही खास क्षणदेखील या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अरुण कदम यांचे जवळचे नातेवाईक तसहक त्यांच्या लेकीच्या सासरकडच्या मंडळींनी या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला होता.
दरम्यान, २०२१ मध्ये सुकन्याचं सागर पोवाळेशी लग्न झालं. ती कमर्शिअल आर्टिस्ट व ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. सुकन्या तिच्या वडिलांबरोबर अनेक रील व्हिडीओ बनवत असते. तसंच अरुण कदम हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. नातवाबरोबरचे खास व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्यांच्या लेकीने अथांगचा नुकताचं शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.