शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केतकी-फाल्गुनीने विरोचकाच्या सांगण्यावरुन अन्न-पाणी सोडलं, रुपालीची राजाध्यक्षांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, नेत्रा भडकली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 10:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial Update New Twist

केतकी-फाल्गुनीने विरोचकाच्या सांगण्यावरुन अन्न-पाणी सोडलं, रुपालीची राजाध्यक्षांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, नेत्रा भडकली अन्...

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता असते. अनेक उत्कंठावर्षक व रहस्यमय कथानकाने छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने सर्वांची मनं जिंकली आहेत. मालिकेत येणारे नवनवीन ट्विटस हीच या मालिकेची जमेची बाजू आहे.

मालिकेत येणारे ट्विस्ट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. नुकताच रुपालीने राजाध्यक्ष कुटुंबातील फाल्गुनी व केतकी काकू यांना संमोहित केल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. संमोहित झाल्याने त्या दोघी वाटेल ते करत आहेत. संमोहित झाल्यामुळे फाल्गुनी व केतकी काकू स्वयंपाक घरातील सर्व भांडी बाहेर फेकून देतात. हातात येईल ते सामान त्या दोघी बाहेर फेकत आहेत. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी नेत्रा व इंद्राणीसह  घरातील इतर मंडळी त्या दोघींना बांधून ठेवतात.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – दहावीत असताना पहिलं ब्रेकअप अन्…; विशाखा सुभेदारांचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “प्रेमपत्र दिलं…”

त्या दोघींना बांधून ठेवल्याचे रुपालीला कळताच रुपाली केतकी व फाल्गुनीला अन्न-पाण्याचा त्याग करायला सांगते. कुणी काहीही दिलं तरीही तुम्ही ते खायचं नाही असं ती त्या दोघींनी सांगते. त्यामुळे त्या दोघीही काहीच खातपित नाहीत. यानंतर रुपाली पोलिसांना फोन करुन राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध तक्रार करते. त्यामुळे घरात पोलिस येतात आणि मग रुपाली राजाध्यक्ष कुटुंबीय घरातील व्यक्तींचा छळ होत असल्याचं म्हणते. यानंतर पोलिस घरी येताच रुपाली त्या पोलिसांनादेखील संमोहित करते.

आणखी वाचा – माहेरची साडी सेंटर, चाळ व मेट्रो स्टेशन, इतका भव्यदिव्य आहे डॉ. निलेश साबळेच्या नव्या शोचा सेट, पाहा व्हिडीओ

गेल्या भागात ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रेक्षकांना हे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता येत्या आगामी भागात नक्की काय पाहायला मिळणार? यांची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. रुपाली राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध पोलिसांचा कसा वापर करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
dharmendra and hema malini wedding anniversary

लग्नाला ४४ वर्ष पूर्ण होताच धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, एकमेकांना किसही केलं अन्…; फोटो व व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.