सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये आहे. ‘गदर २’ पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. १५ दिवसांमध्ये या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘गदर २’ची सर्वत्र चर्चा असताना कोकण हार्टेट गर्ल अंकिता वालावलकरने चित्रपटाबाबत नकारात्मक व्हिडीओ शेअर केला आहे.
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘गदर २’मधील चुका व हा चित्रपट चांगला नसल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली, “‘गदर २’ चित्रपट मी पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर माझं डोकंच चालेना. असे चित्रपट दाखवून तुम्हाला लोकांना काय सांगायचं असतं?. मी एका महिलेला पाकिस्तानामधून आणलं, सूनेलाही पाकिस्तानातून आणलं. ती सीमा एक सचिनसाठी ‘तारों के निछेसे’ म्हणत पाकिस्तानमधून इथे आली आहे”.
आणखी वाचा – “बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…”, लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, “नाश्तासुद्धा…”
“सगळीच मुलं जर तुम्ही पाकिस्तानमधून आणत असाल तर आमचं काय होईल? आम्हाला कोण बघणार?. अशाने आमची पोरं वेडी होतील. मग आमचं पुढे काहीच होणार नाही. त्यापेक्षा काहीतरी चांगलं दाखवा ना. यापुढे जर अपेक्षा ठेवली की माझ्यासाठी कोणतरी ‘तारों के निछेसे’ येईल पण मी कोकणामधली आहे. त्यामुळे ते शक्य नाही. जेवढे बदल आम्ही रिलमध्ये करत नाहीत ना तेवढे बदल त्या चित्रपटामध्ये (गदर २) दिसत आहेत”.
आणखी वाचा – Video : सासूबाईंच्या लग्नात त्यांना जोडवी घालताना मिताली मयेकरला अश्रू अनावर, म्हणाली, “हा क्षण…”
“ड्रोन तर असा वापरलं आहे की सांगताच येत नाही. संपूर्ण चित्रपटामध्ये अमिषा पटेलच्या चेहऱ्यावर एकच हावभाव आहेत. “मैं देख रहीं हूँ पापा को कितना दुख हुआ रहेगा” हे वाक्य बोलतानाही तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकच होते. इतका जर घाणेरडा अभिनय करायचा असेल तर आम्ही रिलकरीही तो करतो. सनी देओल पंप काढतो. इतकंच असेल तर त्याला पावसामध्ये सिंधुदुर्गमध्ये एकदा पाठवा. कारण पावसामध्ये लाइटचे जे पोल पडतात ते उचलायला कोण येत नाही. असे चित्रपट दाखवून माझ्या अपेक्षा वाढतात. पुढे कधी जर माझा चित्रपट आला तर घाणेरडा अभिनय तुम्ही पाहिला पाहिजे. माझाही चित्रपट सुपरहिट ठरला पाहिजे. पुढचं मला काय माहीत नाही आधीच सांगते”. तू अजून जळ, दुसऱ्यांचं टेन्शन घेऊन स्वतःचे केस पांढरे कर, तुझ्या का पोटात दुखतंय? असं नेटकऱ्यांनी अंकिताच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.