nimish kulkarni engagement : ‘चला हवा येऊ द्या’ या रिऍलिटी शोने आजवर अनेकांना खळखळवून हसवलं. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. गेली अनेक वर्ष हा शो सुरु असून यातील कलाकार त्यांच्या विनोदी अंगाने मनोरंजन करताना दिसले. अनेक नवोदित कलाकारांना या शोने मोठं होण्याची संधी दिली. त्यापैकी एक म्हणजे निमिष कुलकर्णी. निमिषने या शोमधून त्याच्या विनोदी कलेने प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही निमिष बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच निमिषने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हातातील रिंग फ्लॉट करतानाचे फोटो त्यांनी शेअर करत साऱ्यांचे लक्ष वेधले.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नुकताच, अभिनेत्याचा साखरपुडा समारंभ उरकला असल्याचं पाहायला मिळालं आहे. निमिषने इंस्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत सुखद धक्का दिला आहे. अगदी पारंपरिक अंदाजात त्याचा हा साखरपुडा समारंभ उरकला असल्याचं फोटोंवरुन स्पष्ट होत आहे. यावेळी निमिषने पांढऱ्या रंगाची डिझाइनर शेरवानी परिधान केली. तर त्याच्या पत्नीने जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर भरजरी दागिने परिधान करत लूक पूर्ण केला.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, “ही कोर्ट केस संपली की…”
निमिषची पत्नी कोमल भास्कर आहे. ती देखील मनोरंजन विश्वात कार्यरत असल्याचं तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून स्पष्ट होत आहे. कोमल ही अनेक मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते. साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं की, “एक नवीन सुरुवात…आता आयुष्यभर आम्ही एकत्र असू”. यासह तिने साखरपुडा झाल्याची तारीखही शेअर केली आहे. काल २५ जुलै २०२५ रोजी निमिष व कोमल यांनी साखरपुडा सोहळा उरकला.
निमिष आणि कोमलने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहते मंडळींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. निमिष आणि कोमलच्या या पोस्टवर समीर चौघुले यांची कमेंट लक्षवेधी आहे. ‘अभिनंदन जावई बापू’, असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.





