शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून गायक बादशाहची चौकशी, पण यामागचं नेमकं कारण काय?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 31, 2023 | 9:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Badshah Controversy Online App Case

ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून गायक बादशाहची चौकशी, पण यामागचं नेमकं कारण काय?

बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतो. कधी त्याच्या गाण्यामुळे, तर कधी त्याच्या वक्तव्यांमुळे. मध्यंतरी तो त्याच्या ‘सनक’ गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. असं असतानाही त्याची लोकप्रियता तसभूर कमी झालेली नाही. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असून त्याच्या आगामी गाण्यांची माहिती त्याच्या चाहत्यांना सतत देत असतो. मात्र, हा प्रसिद्ध रॅपर आता एका प्रकरणामुळे चर्चेत आलेला आहे. नुकताच एका ऑनलाइन बेटिंग ॲप कंपनी प्रकरणी बादशाहची चौकशी झाल्याचे समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. (Badshah Controversy Online App Case)

महाराष्ट्र सायबर सेलने रॅपर बादशाहला एका ऑनलाइन बेटिंग ॲप कंपनी प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. न्यूज एजन्सी एएनआयने याबाबतची माहिती दिली. संबंधित बेटिंग ॲप कंपनीने विनापरवानगी आयपीएलचं थेट प्रक्षेपण केला असल्याचा आरोप करण्यात आला असून बादशाहने या कंपनीची जाहिरात केली. त्यामुळे त्याची या प्रकरणी आज चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकरणात बादशाहसह रणबीर कपूर, संजय दत्त, कपिल शर्मा यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती.

हे देखील वाचा – “मराठा समाजातल्या मागास…”, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “त्यांच्या तब्येतीसाठी मी…”

#WATCH | Maharashtra Police Cyber Cell is questioning rapper Badshah in Mumbai, in connection with the online betting company app 'FairPlay'. pic.twitter.com/QAcEYqk7Ly

— ANI (@ANI) October 30, 2023

न्यूज एजन्सी एएनआयने नुकतंच एक ट्वीट शेअर केलं. ज्यात बादशाह चौकशीला सामोरं गेला असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत अशी माहिती दिली की, “महाराष्ट्र सायबर सेल रॅपर बादशाहची ऑनलाइन बेटिंग कंपनी ‘फेअरप्ले’ ॲपच्या संदर्भात चौकशी करत आहे. बादशाहसह अन्य ४० कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली होती.” दरम्यान, या प्रकरणी आता रणबीर कपूर, संजय दत्त सह अन्य ४० कलाकारांना समन्स बजावले जाणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.

हे देखील वाचा – Bigg boss season 17 : “मुलांचा वापर करते आणि…” अभिषेक कुमारचे ईशा मालवीयवर गंभीर आरोप, म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये असताना इतर मुलांबरोबर ती…”

या कंपनीने विनापरवानगी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले आहे. त्यामुळे अधिकृत प्रसाराणकर्त्यांनी संबंधित कंपनीविरोधात सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे, बादशाहसह वरील सर्व कलाकारांनी एका बेटिंग ॲपचा प्रचार केला होता. त्यामुळे त्या सर्वांची चौकशी होणार असल्याचं बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरवर याच प्रकरणात ईडीने समन्स पाठवला होता. गायक व रॅपर असलेल्या बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असून ‘डीजे वाले बाबू’, ‘गेंदा फूल’, ‘लेट्स नाचो’ यांसारखी अनेक गाणी गाजली आहे.

Tags: badshahBadshah Controversy Online App Casebollywood singer
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ashvini Mahangade On Manoj Jarange Patil

“आता नाही तर कधीच नाही…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा, म्हणाली, "आत्महत्या…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.