Celebrities in Oath Taking Ceremony : आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. याआधी बुधवारी महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी समितीच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि फडणवीस उपस्थित होते. भाजपने सीतारामन आणि रुपाणी यांना पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. या कार्यक्रमाला आता आझाद मैदानावर सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा – जहागीरदारांच्या घरात लीला पुन्हा येणार का?, एजेंच्या एका निर्णयावर संसार सुरळीत होणार? कथा निर्णायक वळणावर
#WATCH | Actor Salman Khan attends the oath ceremony of the Maharashtra government at Azad Maidan in Mumbai
— ANI (@ANI) December 5, 2024
(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/Pf58D9QCfZ
सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्त, रणवीर सिंह आल्यानंतर आझाद मैदानावर स्टार्सचा जल्लोष पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही त्याच्या कुटुंबासह दाखल झाला आहे. नितीश कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर अनेक मुख्यमंत्रीही पोहोचले. राम नाईक, नारायण राणे हेही उपस्थित होते. अनंत अंबानी, दीपक पारीख आणि बिर्ला कुटुंबीयही आले.
#WATCH | Mumbai | Actor Ranveer Singh attends the oath ceremony of the Maharashtra government
— ANI (@ANI) December 5, 2024
(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/4nN6KDeFNn
आणखी वाचा – बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण…; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन
आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मराठी संगीतकार अजय-अतुल यांचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. पाहुणे येताच लोक संगीतावर नाचत आहेत. अनेक जिल्ह्यांतून महिलांचे गटही कार्यक्रमाला पोहोचले आहेत. संबंध कार्यक्रमाला या कलाकार मंडळींच्या उपस्थितीने चारचाँद लागले आहेत. बरेचदा ही कलाकार मंडळी सरकारच्या अनेक धोरणांना पाठींबा देताना दिसतात. इतकंच नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या जाहिराताईंमध्येही ही कलाकार मंडळी सहभाग दर्शवतात.