गुरूवार, एप्रिल 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध…”, ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचे IAS पत्नीवर गंभीर आरोप, म्हणाले, “ती वेगळ्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2024 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nitish Bharadwaj On Wife

"१३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध...", 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांचे IAS पत्नीवर गंभीर आरोप, म्हणाले, "ती वेगळ्या..."

‘महाभारत’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणीत आहेत. अभिनेते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पत्नी स्मिता गाते यांच्या विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली असून हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी पत्नीवर राग काढला होता. अशातच नितीश यांनी ,१३ वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हते हे भाष्य लक्षवेधी ठरलं. (Nitish Bharadwaj On Wife)

नितीश भारद्वाज आपल्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. नितीश यांना नोकरी करु द्यायची नाही, असा आरोप त्यांची आयएएस पत्नी स्मिता यांनी केला. नितीश म्हणाले की, “त्यांना जगाला दाखवायचे आहे की त्यांचे पती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत. नितीश यांनी अनेक पुरावे दाखवले की, तिला निलंबित करण्यात आले आहे. तेव्हा त्यांनी तिला नोकरी परत मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले”.

आणखी वाचा – ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न मोडल्याचे दुःख सहन होईना, तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली अन्…; दारुचं व्यसन आणि गरिबीत काढलं आयुष्य

नितीश यांनी सांगितले की, “त्यांच्या पत्नीने यापूर्वीच दोन घटस्फोट घेतले आहेत”. ते म्हणाले की, “२०१६ पर्यंत सातवे वेतन आयोग लागू केला जाईल. यानंतर त्या राजीनामा देणार आहेत. तिने सांगितले की, तिला चांगले कौटुंबिक जीवन हवे आहे आणि ती सरकारी नोकरीला कंटाळली आहे. लग्नाबाबत मी ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ती चांगली स्त्री आहे म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केले”. नितीश यांनी सांगितले की, “मे २०१२मध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीने पुण्यात घर घेतले. इंडस्ट्रीतील लोकांना कर्ज मिळत नाही कारण त्यांना निश्चित पगार मिळत नाही, म्हणून त्यांच्या पत्नीने कर्ज घेतले पण ते मला परत करावे लागले. फ्लॅटची ७० टक्के रक्कम दिली”. यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरुच होती.

आणखी वाचा – “मालिकेला चांगलं वळण द्या…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मागणी, म्हणाले, “काहीतरीच जगावेगळं…”

नितीशने सांगितले की, “ती अतिशय उद्धट स्वभावाची आहे आणि ती नीट वागत नाही. जेव्हा तो तिच्या पहिल्या पतीला भेटला तेव्हा त्याला समजले की मुख्य समस्या ही आहे की तिला स्त्री-पुरुष संबंधात राहायचे नव्हते. माझा प्रश्न आहे मग तू लग्न का करतोस? तू तीन वेळा लग्न का केलेस? तिला लग्न न मोडता एकट्याने वैवाहिक जीवन जगायचे आहे”. नितीश यांनी सांगितले की, सातवा वेतन आयोग आल्यानंतर त्यांच्या पत्नीने मी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. या बहाण्याने अनेक गोष्टी मान्य करून घेतल्याने त्याला धक्काच बसला. नितीश म्हणाले की, त्यांच्या पत्नीचा पगार दरमहा साडेतीन लाख रुपये आहे, तरीही ते मुलांचा सर्व खर्च उचलत आहेत. नितीश पुढे म्हणाले, “१३ वर्षे झाली माझे त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध नाहीत. मी जेव्हाही तिला भेटायला जायचो तेव्हा ती वेगळ्या खोलीत राहायची. ती मुलांबरोबर आणि मी वेगळे. कधी-कधी मुलं माझ्याजवळ येऊन झोपायची, मी त्यांना लोरी गाऊन झोपायला लावत असे पण आमच्यात शारीरिक संबंध नव्हते. ती नाकारायची”.

Tags: entertainment newsnitish bharadwajnitish bharadwaj divorce processNitish Bharadwaj On Wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Sambhavna Seth life
Entertainment

चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

एप्रिल 30, 2026 | 3:00 pm
sambhavna seth is pregnant
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 30, 2026 | 1:16 pm
 anil gawas on aastad kale
Entertainment

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Next Post
ranveer singh and ranbir kapoor

ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.