बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सलमानने आजवर त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनयाबरोबरच तो त्याच्या दयाळू स्वभावासाठीही ओळखला जातो. बॉलिवूडचा भाईजान अशी लोकप्रियता असलेला सलमान इतरांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतो. बरेचदा मदतीसाठी पुढे केलेले हात तो दाखवतही नाही. अशा परिस्थितीत सलमानचा खास मित्र विंदू दारा सिंगने त्याच्याबद्दल एक खुलासा केला आहे. सलमानच्या कॉलेजच्या दिवसातील त्याचा खास मित्र विंदू दारा सिंगने अभिनेत्याबद्दल अनेक रंजक किस्से शेअर केले आहेत. इतकंच नव्हेतर पॉकेट मनीचे तो काय करायचा याचाही खुलासा केला आहे. (Vindu Dhara Singh On Salman Khan)
विंदू दारा सिंग याने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यादरम्यान विंदूने सलमान खानबद्दलच्या अनेक गोष्टीही शेअर केल्या. पॉकेटमनीच्या पैशातून तो काय करायचा याबद्दलही सांगितले. विंदू म्हणाला, ‘सलमान खान आणि मी बालपणीचे मित्र आहोत. आम्ही एकमेकांना ओळखून बराच काळ लोटला. अभिनेता असण्याबरोबरच तो एक चांगला माणूसही आहे. सलमान आज करोडो कमावतो, पण आजही त्याचे वडील सलीम खान त्याला रोज पॅकेट मनी देतात.
पुढे तो म्हणाला, “त्याचवेळी सलमानने हे पैसे स्वतःकडे ठेवण्याऐवजी त्याचा सहाय्यक नदीमकडे दिले होते. त्याच्या वडिलांनी त्याला ५०,000 रुपये किंवा १ लाख रुपये जरी दिले तरी ते गरिबांना दान करायचा. आणि हे आजही सुरु आहे. सलमान खान म्हणतो की त्याने माझे शरीर पाहूनच व्यायाम करायला सुरुवात केली. मी त्याला नेहमी एकच सांगतो, तू प्रत्येक गोष्टीचा खूप अतिरेक करत आहेस. तो डुकरासारखा खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो.
पुढे तो म्हणाला, “सलमान जेवढे खातो ते पाहून आपण विचारल की ‘सगळे अन्न कुठे जाते?’ तर यावर त्यांचे उत्तर नेहमी असंच असतं की ते अन्न जाळलं जातं. आणि खरं तर, सलमान त्याच्या संध्याकाळच्या वर्कआऊटमध्ये तेच करतो. माझं खरंच सलमानवर खूप प्रेम आहे. तो एक अद्भुत व नेहमी उपयोगी पडणारी व्यक्ती आहे”, असं म्हणत त्याने सलमानची स्तुती केली.