मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्ष विविध बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व नृत्य कौशल्याने तिने जगभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे. जरी ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जात असली, तरी तिची मराठी सिनेसृष्टीशी घट्ट नाळ कायम आहे. २०१८ मध्ये माधुरीने ‘बकेट लिस्ट’ नावाचा मराठी चित्रपट केला होता, जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुकदेखील झाले होते. त्यानंतर माधुरी हिने तिचा पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्रीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. (Madhuri Dixit new Marathi Movie)
माधुरी व श्रीराम नेने यांनी ‘आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स’ बॅनरअंतर्गत ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्याचे दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी केलं आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. ज्यावर चित्रपटाच्या नावाची घोषणा करतानाच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. ५ जानेवारी २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आदिनाथ कोठारे, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – “तुझ्या शारीरिक वेदना…”, आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारेंची भावुक पोस्ट; म्हणाल्या, “त्या धक्क्यातून…”
माधुरीने इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केलं आहे. हे शेअर करताना ती म्हणाली, “दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमचं ‘आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स’ आणि प्रतिभावान दिग्दर्शक जयंत जठार आणि राहुल आवटे यांच्यासह आमचा दुसरा चित्रपट ‘पंचक’ प्रेक्षकांसाठी घेऊन येताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी आपण सज्ज व्हा.” तसेच हा चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
हे देखील वाचा – “हेच पाहायचं राहिलं होतं”, ‘आई कुठे…’ अरुंधती होणार आई? नवा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “आशुतोष तर आधीच…”
दरम्यान, अभिनेत्रीने चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी माधुरी व पती डॉ. श्रीराम नेने यांनी ‘१५ ऑगस्ट’ या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता लवकरच ते ‘पंचक’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाची नेमकी कथा काय असणार? आणि चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे.