साऊथ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडून रश्मीका मंदान्नाने सगळ्यांनाच वेड लावलं. साऊथच नव्हे तर संपूर्ण जगात रश्मीकाने आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची भुरळ घातली आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये रश्मीकाने उत्तम काम केले आहे. या साऊथ अभिनेत्रीने आता बाॅलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. गुडबाय या हिंदी चित्रपटातून रश्मीकाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हिंदी नंतर आता महाराष्ट्रातल्या एका मराठी कार्यक्रमालाही रश्मीका ने उपस्थित राहून चारचाँद लावलेत.(rashmika mandana)
यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव २०२३’ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली ‘रश्मिका मंदान्ना’ होती. यंदाच्या या कार्यक्रमात रश्मीका आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे.
पहा कशी वाढवली झी चित्रगौरवची रश्मीकाने शोभा – (rashmika mandana)
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230313-WA0009-682x1024.jpg)
या लावणीची विशेष बाब म्हणजे रश्मीकाने ही लावणी वन टेक मध्ये केली आहे, या सोबतच या कार्यक्रमात ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसणार आहे. रश्मिकाचा हा धमाकेदार परफॉर्मन्स झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ या कार्यक्रमात रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. तिच्या स्माइलचे लाखो चाहते आहेत. तिच्या पोस्टवर तिचे फॉलोअर्स सोशल मीडियावरून नेहमीच तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय झालेल्या रश्मीकाने गीता गोविंदा, चल प्रिये, कॉम्रेड, सुलतान आणि पुष्पा यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य सिनेमांसोबतच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे. अवघ्या १७व्या वर्षांपासून रश्मीकाने सिनेविश्वात काम करायला सुरुवात केली त्यामुळे कमी वयातच ती एक उत्तम, सुजाण अभिनेत्री बनली आहे.(rashmika mandana)
====
हे देखील वाचा – ‘मौसम आशिकाना..’ म्हणणारी प्राजक्ता पडलीय का प्रेमात?
====
साऊथ सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूडमध्येही तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या फोटोंची झलक पाहण्यासाठी चाहतेही वाट पाहत असतात. रश्मिकाची दिलखेच स्माइल आणि बोलण्याच्या पद्धतीचे लाखो दिवाने आहेत.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/03/Picsart_23-03-13_15-57-35-436-1-1-1024x576.jpg)