प्रत्येक महिलेसाठी आई होणं म्हणजे दुसरा जन्म घेण्यासारखंच असतं.आई मुलीचं नातं हे नेहमी खास असतं.असाच खास बॉण्ड अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि तिच्या मुलीमध्ये नेहमी पाहायला मिळतोय.
छोट्या पडद्यावरून प्रसारित होणारी आई कुठे काय करते ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेत असणाऱ्या सर्व कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.या मालिकेचं कथानक हे अरुंधतीभोवती फिरत असतं. अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही तर महिलांसाठी आयडॉल ठरली आहे. ही भूमिका मधुराणीनं अतिशय उत्तम साकारली आहे. अरुंधतीच्या भूमिकेमुळे मधुराणी घराघरात खूपच लोकप्रिय झाली आहे.अभिनयासोबत अरुंधती सोशल मीडियाद्वारे देखील चाहत्यांसोबत कनेक्टेड असते.ती या मालिकांच्या संबंधित तसेच ती खाजगी आयुष्यातील काही पोस्ट देखील शेअर करते.अधिकतर ती तिच्या मुलीसोबतचे व्हिडीओ शेअर करते. तर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(Madhurani Prabhulkar)

अरुंधती ही मालिकेत तीन मुलांची आई आहे पण ती खऱ्या आयुष्यात एका मुलीची आई आहे, तिच्या मुलीचं नाव स्वराली आहे.अरुंधती स्वरालीसोबतचे काही फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर केला पण आता स्वराली ही अरुंधतीची आई बनलेली दिसते. ती अरुंधतीला ओरडताना देखील दिसते.i am your mother you listen me या गाण्यावर दोघी थिरकताना दिसतात. मुलगी जेव्हा आई होते.असं कॅप्शन तिने या व्हिडिओला देताच चाहत्यांनी किती गोड,खूपच सुंदर, मायलेकीचं नातं सगळ्यात सुंदर असतं ते असं अश्या अनेक कमेंट केल्या आहेत.(Madhurani Prabhulkar)
अरुंधती आणि स्वराली यांच्यात खुप चांगला बॉण्ड आहे.हे तिच्या अनेक पोस्टमधून दिसून येत.यासोबत अरुंधती तिच्या मालिकेतील मुलांसोबत देखील फोटो व्हिडीओ शेअर करत असते.तिच्या या फोटोना देखील चाहत्यांची पसंती मिळतेय. तसेच अरुंधती ही उत्तम अभिनेत्री सोबतच उत्तम गायिका देखील आहे.अरुंधती उत्तम गाणी गाताना दिसते. मालिकेत देखील आता अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं असून आता या नव्या जोडप्यामध्ये हळूहळू प्रेम उलघडताना दिसतंय.