शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पक्ष फोडणे, ईडी अन्…”, निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “खरे वाघ…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 5, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lok Sabha Elections 2024 Marathi actress Renuka Shahane shared a post on social media about yesterday's results

"पक्ष फोडणे, ईडी अन्...", निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, "खरे वाघ..."

देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून काल (४ जानेवारी) रोजी या निवडणुकांचा निकाल लागला. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार की नव्याने सत्तापालट होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच काल पार पडलेल्या या निकालावर एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पसत शेर केली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे.

अभिनेत्री रेणुका शहाणे या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्री आपल्या राजकीय भूमिकांमुळेही चर्चेत राहत असतात. त्या सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर नेहमीच भाष्य करत असतात. अशातच कालच्या निकालानंतर रेणुका शहाणे यांनी एक खोचक पोस्ट शेर केली आहे. रेणुका यांनी त्यांच्या  इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे.

रेणुका शहाणे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कालच्या निकालावर एक खोचक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “राजकारण करा, पण कटकारस्थान, पक्ष फोडणे, ईडी व आयटीचा दूरुपयोग करु नका. खरे वाघ हे कोण ते कळलंच असेल. खरी श्रद्धा आणि श्रद्धेचा दिखावा यात खूप अंतर आहे. जनतेचा कौल विनम्रतेने स्वीकारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.”

आणखी वाचा – Video : पारू, आदित्य व दिशा यांचा ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्यावर भन्नाट डान्स, सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, रेणुका यांनी काही दिवसांपूर्वी एका कंपनीने मराठी तरुणांना नोकरी मिळणार नाही याबद्दलच्या एका पोस्टवरही आपली प्रतिक्रिया व्यक्ते केली होती. मराठी माणसांबरोबरच्या या दुजाभावावर रेणुका शहाणे यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी मराठी माणसांबरोबर दुजाभाव करणाऱ्यांना मत देऊ नका असं म्हटलं होतं.

आणखी वाचा – “लग्नानंतर तुम्हाला कोणी प्रपोज केलं का?”, चाहत्याने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकरांनी दिलं थेट उत्तर, म्हणाल्या, “माझं लग्न…”

अशातच आता रेणुका शहाणे यांनी कालच्या निकालावरही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण या पोस्टद्वारे त्यांनी नक्की कुणावर निशाणा साधला आहे? त्यांची ही खोचक पोस्ट नक्की कुणासाठी आहे. हे कळू शकलेले नाही.

Tags: Lok Sabha Election Result Newsmarathi actressmarathi entertainment newsrenuka shahane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Paaru Serial Update

आदित्यच्या लग्नाची तयारी सुरु, मुलगीही पसंत केली आणि…; अहिल्यादेवींसमोर येणार ऍडशूटच्या लग्नाचं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.